28.4 C
Mumbai
Thursday, October 29, 2026
घरस्पोर्ट्सपहिलाच चेंडू बाउंड्रीचा असेल, तर मारणारच!

पहिलाच चेंडू बाउंड्रीचा असेल, तर मारणारच!

Google News Follow

फलंदाजीच्या क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावरून पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर आल्यानंतर माझ्या खेळण्याच्या शैलीत बदल झाला आहे. पहिलाच चेंडू सीमारेषेपार पाठवण्यासारखा असेल, तर त्यावर फटका मारण्याचा विचार करतो, असे भारतीय टी-२० संघाचा उपकर्णधार तिलक वर्मा याने स्पष्ट केले. न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या टी-२० सामन्यापूर्वी बोलताना त्याने फिनिशरच्या भूमिकेतील आपली रणनीती सांगितली.

तिलकने भारतीय टी-२० संघात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना सुरुवातीला खेळपट्टीवर स्थिरावण्यावर भर दिला होता. मात्र, आता पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना परिस्थितीनुसार आक्रमक फटके खेळण्यास तो प्राधान्य देतो. पहिल्याच चेंडूवर मोठा फटका मारण्याची संधी नसेल, तर एकेरी-दुहेरी धावा घेत डाव पुढे नेण्यावर भर देतो, असे त्याने सांगितले.

दुसऱ्या टी-२० सामन्यात तिलकने याच रणनीतीचे दर्शन घडवले. त्याने अवघ्या २६ चेंडूंत नाबाद ५१ धावांची खेळी करत भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. न्यूझीलंडने दिलेल्या १८१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने एक चेंडू शिल्लक असताना चार गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात तिलक आणि नितीश रेड्डी यांनी सातव्या गड्यासाठी नाबाद ६९ धावांची निर्णायक भागीदारी केली.

‘शेवटच्या षटकांत गोलंदाजावरच अधिक दबाव असतो’

अखेरच्या षटकांमध्ये फलंदाजापेक्षा गोलंदाजावर अधिक दबाव असतो, असा विश्वास तिलकने व्यक्त केला. गोलंदाजावर दबाव असल्याने धावा काढण्याच्या संधी निर्माण होतात, असा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपण फलंदाजी करत असल्याचे त्याने सांगितले.

नितीश रेड्डीसोबतच्या भागीदारीबद्दल बोलताना तिलक म्हणाला की, दोघांनीही खेळपट्टीवर टिकून राहून सामना शेवटपर्यंत नेण्याचे ठरवले होते. त्यातूनच भारताला कठीण परिस्थितीत विजय मिळवता आला.

भारताची मालिकेत ३-० अशी आघाडी

न्यूझीलंड दौऱ्यात भारतीय संघाने दमदार कामगिरी केली आहे. तिसऱ्या टी-२० सामन्यात अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशी यांनी आक्रमक फलंदाजी करत भारताला अवघ्या १३.२ षटकांत विजय मिळवून दिला. अभिषेकने ३८ चेंडूंत ११३ धावा, तर वैभवने १९ चेंडूंत ४५ धावा केल्या. दोघांनी पहिल्या सहा षटकांत ११८ धावा जोडल्या. भारताने हा सामना सहा गडी राखून जिंकत पाच सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली.

वेस्ट इंडिजविरुद्धची मायदेशातील मालिका खेळल्यानंतर न्यूझीलंडमध्ये दाखल झालेल्या भारतीय संघाला वेगळ्या वातावरणाशी आणि वेळेतील फरकाशी जुळवून घेण्यासाठी कमी वेळ मिळाला. मात्र, व्यस्त वेळापत्रकाचे कारण पुढे करता येणार नाही. युवा खेळाडूंसमोर आदर्श निर्माण करण्याची जबाबदारी आपली असल्याचे तिलकने सांगितले.

आता शुक्रवारी ऑकलंड येथे होणाऱ्या चौथ्या टी-२० सामन्यात विजय मिळवून मालिकेत ४-० अशी आघाडी घेण्याचे भारताचे लक्ष्य असेल. त्यानंतर अखेरचा सामना जिंकून न्यूझीलंडला ५-० ने क्लीन स्वीप देण्याची संधी भारतीय संघाकडे असेल.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा