30 C
Mumbai
Tuesday, September 15, 2026
घरस्पोर्ट्सविनेश फोगाटची डब्ल्यूएफआयविरोधात कोर्टात ‘कुस्ती

विनेश फोगाटची डब्ल्यूएफआयविरोधात कोर्टात ‘कुस्ती

Google News Follow

Related

कुस्तीपटू विनेश फोगाट हिच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने भारतीय कुस्ती महासंघाकडून (WFI) उत्तर मागितले आहे. फोगाटने तिच्याविरोधात बजावण्यात आलेली ‘कारणे दाखवा नोटीस’ आणि शिस्तभंगाची कारवाई यांना न्यायालयात आव्हान दिले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २९ सप्टेंबर रोजी होणार आहे.

न्यायमूर्ती स्वर्ण कांता शर्मा यांनी सांगितले की, या प्रकरणात सध्या कोणतीही औपचारिक नोटीस जारी केली जात नाही. मात्र, न्यायालयाने कुस्ती महासंघाच्या वकिलांना २९ सप्टेंबरपर्यंत महासंघाकडून आवश्यक निर्देश घेण्यास सांगितले आहे.

विनेश फोगाटच्या म्हणण्यानुसार, तिला ९ मे आणि १७ जून रोजी दोन नोटिसा बजावण्यात आल्या. मातृत्व रजेनंतर स्पर्धात्मक कुस्तीमध्ये पुनरागमन करण्याच्या प्रयत्नांना अडथळा आणण्यासाठी महासंघाकडून मनमानी आणि दुर्भावनापूर्ण कारवाई केली जात असल्याचा आरोप तिने केला आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाने फोगाटच्या आणखी एका याचिकेवरही सुनावणी केली. गर्भावस्थेनंतर महिला खेळाडूंना स्पर्धात्मक क्रीडेत पुनरागमन करण्यासाठी निष्पक्ष, निश्चित आणि पारदर्शक मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्याचे निर्देश भारतीय कुस्ती महासंघाला द्यावेत, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.

पॅरिस ऑलिम्पिकनंतर घेतला होता निवृत्तीचा निर्णय

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये विनेश फोगाटने अंतिम फेरी गाठली होती. मात्र, अंतिम सामन्यापूर्वी वजन निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त आढळल्याने तिला अपात्र ठरवण्यात आले आणि अंतिम सामना खेळता आला नाही. त्यानंतर तिने आंतरराष्ट्रीय कुस्तीमधून निवृत्ती जाहीर केली.

मात्र, निवृत्तीनंतर काही काळातच देशासाठी ऑलिम्पिक पदक जिंकण्याची इच्छा पुन्हा जागी झाल्याचे सांगत विनेशने कुस्तीमध्ये पुनरागमनाची घोषणा केली. तिने सराव सुरू केला. मात्र, आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी झालेल्या निवड चाचणीत तिला पात्र ठरता आले नाही.

या निवड चाचणीदरम्यान विनेशने भारतीय कुस्ती महासंघाकडून आपल्यासोबत पक्षपातीपणाचे वर्तन केले जात असून पुनरागमनाच्या मार्गात अडथळे निर्माण केले जात असल्याचा आरोप केला होता.

३२ वर्षीय विनेश फोगाट हिने आशियाई क्रीडा स्पर्धा, आशियाई अजिंक्यपद स्पर्धा आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदके जिंकली आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
333,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा