28 C
Mumbai
Saturday, December 6, 2025
घरस्पोर्ट्सअति'विराट'!! एका क्रिकेट प्रकारातील सर्वाधिक शतकांचा सचिनचा विक्रम मोडला

अति’विराट’!! एका क्रिकेट प्रकारातील सर्वाधिक शतकांचा सचिनचा विक्रम मोडला

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १३५ धावांची खेळी

Google News Follow

Related

रांचीतील आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात भारताचा सुपरस्टार विराट कोहलीने महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडत इतिहास रचला. कोहलीने या सामन्यात आपले ५२वे वनडे शतक झळकावून एकाच क्रिकेट प्रकारात सर्वाधिक शतके ठोकण्याचा जागतिक विक्रम आपल्या नावावर केला. विराटच्या या शतकामुळे भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना ८ बाद ३४९ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेपुढे त्यांनी ३५० धावांचे लक्ष्य ठेवले. यात के.एल. राहुलच्या ६० आणि रोहित शर्माच्या ५७ धावांचा समावेश होता.

यापूर्वी कोहली आणि सचिन दोघेही ५१ शतकांसह बरोबरीत होते. सचिनने आपली ५१ शतके कसोटी क्रिकेटमध्ये केली होती. तर विराटने वनडेत ५२ शतके झळकावून एका क्रिकेट प्रकारातील सचिनच्या विक्रमी शतकांना मागे टाकले.

एका फॉरमॅटमध्ये सर्वाधिक शतके (जागतिक विक्रम)

विराट कोहली – ५२ शतके (एकदिवसीय)
सचिन तेंडुलकर – ५१ शतके (कसोटी)
सचिन तेंडुलकर – ४९ शतके (एकदिवसीय)
जॅक कॅलिस – ४५ शतके (कसोटी)
रिकी पॉन्टिंग – ४१ शतके (कसोटी)

दक्षिण आफ्रिकेविरुद्धही सर्वाधिक वनडे शतकांचा नवा विक्रम

कोहलीची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आता ६ वनडे शतके झाली आहेत. त्याने सचिन तेंडुलकर आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या ५-५ शतकांना मागे टाकले.

हे ही वाचा:

‘सरस आजीविका फूड फेस्टिव्हल’चे होणार उद्घाटन

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात १३ विधेयके ठरणार महत्त्वाची

केरळ राजभवनचे नाव बदलणार

दित्वाह चक्रीवादळामुळे मृतांचा आकडा १५३ वर

रांचीतील धडाकेबाज खेळी

कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या पहिल्या वनडे सामन्यात १०२ चेंडूत शतक पूर्ण केले. त्यात ७ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता. इतर फलंदाज धावांसाठी झुंजत असताना कोहली आणि रोहित शर्मा मात्र वेगळ्याच लयीत फलंदाजी करत होते. विराटने पहिल्या ३० धावा त्याने ३ चौकार आणि २ षटकारांमध्ये पूर्ण केल्या. तर ४८ चेंडूत षटकार मारत त्याने अर्धशतक गाठले. संयम न सोडता त्याने १०२ चेंडूत शतक पूर्ण केले.

शतक ठोकल्यानंतर कोहली आणखी आक्रमक झाला. सुबरायनच्या ३९व्या षटकात त्याने ५ चेंडूत २० धावा केल्या. शेवटी तो १३५ धावांवर रायन रिक्लेटनकडून मिड-ऑफवर झेलबाद झाला. रिक्लेटनने पुढे धावत उत्कृष्ट झेल घेतला.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा