काही महिन्यांच्या कालावधीत भारताच्या दुसऱ्या मायदेशातील कसोटी मालिकेतील व्हाईटवॉशनंतर संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याने त्याचे भवितव्य भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ठरवावे असे म्हटल्यानंतर दुसऱ्याच दिवशी, बोर्डाने त्यांच्याबाजूने स्पष्टीकरण दिले आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या खराब कामगिरीवरून मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याच्यावर टीका होत असून सोशल मीडियावरदेखील याबाबत चर्चा आहे.
बीसीसीआयने स्पष्ट केले आहे की, मुख्य प्रशिक्षक किंवा सध्याच्या खेळाडू गटाविरुद्ध कोणतीही तात्काळ कारवाई केली जाणार नाही. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘द इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या माहितीनुसार, आगामी विश्वचषकापूर्वी गंभीरच्या भविष्याबाबत बोर्ड कोणताही निर्णय घेणार नाही, कारण संघ संक्रमणाच्या टप्प्यात आहे.
गौतम गंभीर याने भारतीय संघाच्या पराजयानंतर बोलताना सांगितले होते की, त्याच्या बाबतीतील निर्णय हा बीसीसीआयने घ्यायचा आहे. मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रे स्वीकारताना पहिल्याच पत्रकार परिषदेत म्हटले होते की, भारतीय क्रिकेट महत्त्वाचे आहे; मी नाही. आणि अजूनही त्याच गोष्टीवर ठाम आहे. पुढे म्हटले की तेच प्रशिक्षक होते ज्यांच्या नेतृत्वाखाली भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली, इंग्लंडमध्ये कसोटी मालिका बरोबरीत आणली आणि आशिया कप जिंकला.
गंभीरच्या नेतृत्वाखाली भारताचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २-० असा पराभव हा एका वर्षात तिसऱ्यांदा कसोटी मालिकेत पराभव ठरला. गेल्या वर्षी न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध परदेशात पराभव पत्करावा लागला होता. गेल्या वर्षी न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात ३-० असा पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेसमोर भारताला ०-२ असा पराभव पत्करावा लागला. गंभीरच्या कारकिर्दीत घरच्या मैदानावर एकमेव कसोटी मालिका विजय बांगलादेश आणि वेस्ट इंडिजविरुद्ध मिळाला आहे.
हे ही वाचा..
६ डिसेंबर रोजी मुर्शिदाबादमध्ये राम मंदिराची पायाभरणी करणार!
‘काश्मिरी फळांचा व्यापार करण्यासाठी घेतलेली खोली आणि…’ डॉ. मुझम्मिलचे आणखी कारनामे उघड
हाँगकाँगमध्ये बहुमजली इमारतीला लागलेल्या आगीत ४४ जणांचा मृत्यू; २७९ जण बेपत्ता
यूएस नॅशनल गार्डवरील हल्ला हे दहशतवादी कृत्य!
“बीसीसीआय कोणताही निर्णय घेण्यास घाई करणार नाही, संघ संक्रमणाच्या टप्प्यात आहे,” असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले. “प्रशिक्षक गौतम गंभीरबद्दल सांगायचे तर, आम्ही त्याच्याबाबत कोणताही निर्णय घेणार नाही कारण विश्वचषक जवळ आला आहे आणि त्याचा करार २०२७ च्या विश्वचषकापर्यंत आहे. बीसीसीआय निवडकर्त्यांशी आणि संघ व्यवस्थापनाशी पुढे चर्चा करेल परंतु कोणतीही कठोर कारवाई केली जाणार नाही.”







