यास्तिकाच्या शतकाने इतिहास रचला

लॉर्ड्सवर कसोटी शतक झळकावणारी पहिली भारतीय महिला

यास्तिकाच्या शतकाने इतिहास रचला

इंग्लंडविरुद्धच्या ऐतिहासिक लॉर्ड्स टेस्टमध्ये टीम इंडियाची खेळाडू यास्तिका भाटियाने इतिहास घडवला आहे. यास्तिका भाटीया लॉर्ड्सच्या मैदानात शतक करणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे. 145 बॉलमध्ये यास्तिकाने तिचं शतक पूर्ण केलं आहे. लॉर्ड्सच्या मैदानात पहिल्यांदाच महिलांची टेस्ट मॅच होत आहे, त्यामुळे लॉर्ड्सच्या मैदानात शतक करणारी यास्तिका भाटिया पहिली महिला क्रिकेटपटू ठरली आहे.

डाव्या गुडघ्याला गंभीर दुखापत

याचसोबत यास्तिकाचं नाव लॉर्ड्सच्या ऐतिहासिक ऑनर्स बोर्डवरही लागणार आहे. भारताचा महान खेळाडू सचिन तेंडुलकर यालाही लॉर्ड्सवर शतक ठोकता आलं नव्हतं, पण यास्तिकाने लॉर्ड्सवरच्या तिच्या पहिल्याच टेस्ट मॅचमध्ये हा विक्रम केला आहे. यास्तिका भाटियाला मागच्या वर्षी विशाखापट्टणममध्ये टीम इंडियाच्या वनडे वर्ल्ड कपच्या तयारी शिबिराच्यावेळी दुखापत झाली. यास्तिकाच्या डाव्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली, त्यामुळे तिचं करिअरही संकटात सापडलं. यानंतर तिला बराच काळ रिहॅबिलिटेशनमधून जावं लागलं. तसंच तिला एसीएल सर्जरीही करावी लागली. या दुखापतीमुळे यास्तिकाला मागच्या वर्षीचा वनडे वर्ल्ड कपही खेळता आला नव्हता.

यास्तिका भाटिया काय म्हणाली?

‘मला वाटतं ज्यांना एसीएल सर्जरी करावी लागते, त्यांना माहिती आहे की हे किती कठीण आणि त्रासदायक आहे. त्या पायाची मांसपेशी जवळपास संपलेली असते, तुम्हाला स्वत:ला शून्यापासून पुन्हा सुरू करावं लागतं’, अशी प्रतिक्रिया यास्तिका भाटियाने तिच्या कमबॅकच्या वेळी दिली. ‘रिहॅबच्या वेळी असे काही दिवस आले जेव्हा वाटलं की काहीच प्रगती होत नाहीये, पण मी प्रत्येक दिवशी फक्त प्रयत्न केले. काही महिन्यांनंतर हळूहळू सुधारणा दिसायला लागली. आसपासच्या लोकांनी मला हिंमत दिली. कुटुंब मित्र आणि सेंटर ऑफ एक्सलन्समधल्या कर्मचाऱ्यांनी माझा आत्मविश्वास वाढवला. जेमिमा रॉड्रिग्जही कायम माझ्याबद्दल विचारायची, मी या सगळ्यांची आभारी आहे. शेवट चांगला तर सगळं चांगलं’, असं वक्तव्य यास्तिका भाटियाने केलं.

हे ही वाचा:

ब्रह्मपुत्रावर चीनचा ‘टाईम बॉम्ब’?

वसई का तुंबली? कारण आलं समोर

डोक्यावरील केस कापले, गोमुत्र प्यायला दिले… विनायक राऊतांच्या सुनेची तक्रार

बुलेट ट्रेनच्या तीन नवीन मार्गांची घोषणा

भारतासाठी महिला कसोटी क्रिकेटच्या तिसऱ्या किंवा चौथ्या डावातील (3rd/4th innings) सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या खालीलप्रमाणे आहे:

१०४ (नाबाद)* – यस्तिका भाटिया विरुद्ध इंग्लंड महिला संघ, लॉर्ड्स, २०२६
९८ – संध्या अग्रवाल विरुद्ध न्यूझीलंड महिला संघ, लखनऊ, १९८५
८३ – संध्या अग्रवाल विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघ, वानखेडे, १९८४
८० (नाबाद)* – स्नेह राणा विरुद्ध इंग्लंड महिला संघ, ब्रिस्टॉल, २०२१
७५ – गार्गी बॅनर्जी विरुद्ध इंग्लंड महिला संघ, ब्लॅकपूल, १९८६
७२ – गार्गी बॅनर्जी विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघ, वानखेडे, १९८४

लॉर्डसच्या मैदानात शतक झळकावणारी यास्तिका भाटिया भारताची दुसरी डावखुरी क्रिकेटपटू ठरली आहे. याआधी सौरव गांगुलीने 1996 साली आपल्या पदार्पणाच्या सामन्यातच लॉर्ड्सवर 131 रनची खेळी केली होती.

Exit mobile version