27 C
Mumbai
Friday, December 5, 2025
घरव्हिडीओ गॅलरीफिल्मी फोकसरश्मिका मंदानाच्या ‘द गर्लफ्रेंड’चा ट्रेलर प्रदर्शित

रश्मिका मंदानाच्या ‘द गर्लफ्रेंड’चा ट्रेलर प्रदर्शित

Related

अभिनेत्री रश्मिका मंदाना हिच्या आगामी रोमँटिक ड्रामा चित्रपट ‘द गर्लफ्रेंड’ चा दमदार ट्रेलर शनिवारी प्रदर्शित करण्यात आला असून लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेत्रीने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर ट्रेलर शेअर करत लिहिले, “ही एक साधी प्रेमकहाणी नाही, ही तुम्हाला विचार करायला लावेल. ‘द गर्लफ्रेंड’ चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.” या चित्रपटात रश्मिका मंदानासोबत अभिनेता धीक्षित शेट्टी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

२ मिनिटे ३९ सेकंदांच्या या ट्रेलरमध्ये रश्मिका भूमाच्या भूमिकेत आणि धीक्षित विक्रमच्या भूमिकेत दिसते. चित्रपटात अनु इमॅन्युएलची भूमिकाही महत्त्वाची आहे. हा चित्रपट तेलुगूसह हिंदी, तमिळ, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे. ट्रेलरमध्ये दाखवले आहे की विक्रम (धीक्षित) हा एक टॉक्सिक, डॉमिनेटिंग, अहंकारी, हिंसक आणि संशयी बॉयफ्रेंड आहे, तर भूमा एक साधी, शांत स्वभावाची मुलगी आहे जी अशा विषारी नात्याच्या ओझ्याखाली दबली आहे.

हेही वाचा..

मेरी मिलबेन् यांनी पंतप्रधान मोदींसोबतच्या भेटीच्या आठवणी केल्या ताज्या

ऊर्जा संक्रमण प्रवास शेतकऱ्यांच्या समृद्धीचा मार्ग

सिलिकॉन व्हॅलीतील विषकन्यांचा अमेरिकेला ताप

‘हलाल’ प्रमाणित ‘मेंटोस’ टॉफी कचराकुंडीत

ट्रेलरच्या सुरुवातीला रश्मिका (भूमा) संकोचत विक्रमला विचारते, “आपण थोडं ब्रेक घेऊ शकतो का?” त्यावर विक्रम म्हणतो, “ब्रेक म्हणजे एकमेकांपासून ब्रेकच.” यानंतर कथा मागे फिरते. विक्रम भूमा ला प्रपोज करताना म्हणतो, “परवा शुभ मुहूर्त आहे, चल लग्न करू या.” विक्रमला भूमा वर पूर्ण विश्वास असतो, पण भूमा त्याला फक्त बॉयफ्रेंड म्हणूनच संबोधते. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन राहुल रवींद्रन यांनी केले आहे. संगीत हेशाम अब्दुल वहाब यांनी दिले असून छायाचित्रण कृष्णन वसंत यांनी केले आहे. ‘द गर्लफ्रेंड’ हा एक भावनिक चित्रपट असून तो प्रेम आणि नात्यांच्या गुंतागुंतींना उलगडून दाखवण्याचे वचन देतो. चित्रपटात रश्मिका मंदाना, धीक्षित शेट्टी, राव रमेश आणि रोहिणी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट ७ नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

- Advertisement -National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा