आधी धमकी दिली, मग साखरेसाठी वाडगा पुढे केला…

आधी धमकी दिली, मग साखरेसाठी वाडगा पुढे केला... | Dinesh Kanji | Donald Trump | Xi Jing Ping |

जागतिक महासत्ता म्हणनू मिरवलेल्या अमेरिकेची स्थिती आता प्रचंड बिकट झालेली दिसते. एखादा शेजारी जो रात्री दात ओठ खावून भांडतो आणि दुसऱ्या दिवशी वाटगा घेऊन साखर मागायला दारात येतो तशी स्थिती डोनाल्ड ट्रम्प यांची झालेली आहे. राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी चीनच्या विरोधात वरवंटा चालवायला सुरूवात केली. टेरीफ अस्त्र उगारले. पुढे तेच अस्त्र सगळ्या जगावर चालवले. चीनला आधी धमकी देणाऱ्या ट्रम्प यांनी दोन दिवसांपूर्वी आधी चीनसमोर नाक रगडले. नंतर वाडगा पुढे केला. ट्रम्प यांचे विश्वासू, एफबीआयचे डायरेक्टर काश उर्फ कश्यप पटेल यांच्यावरही भारताला विनंती करण्याची वेळ आली. त्याचे कारणही चीनच होता. थोडक्यात काय ट्रम्प हे गब्बर सिंग व्हायला गेले होते, त्यांचा सुरमा भोपाली झालेला आहे.

Exit mobile version