अंतराळ क्षेत्रावर उमटला GEN-Z चा ‘विक्रम’ ठसा…

अंतराळ क्षेत्रावर उमटला GEN-Z चा ‘विक्रम’ ठसा... | Dinesh Kanji | Skyroot Aerospace |

पवन कुमार चंदना आणि नागा भरत डाका हे दोघेही आयआयटीचे माजी विद्यार्थी. सध्या त्यांचे वय अनुक्रमे ३७ आणि ३६. ठीक १४ वर्षांपूर्वी म्हणजे २०१२ मध्ये ते इस्रोमध्ये दाखल झाले. सहा वर्षे अनुभव घेऊन २०१८ मध्ये बाहेर पडले. स्वतःची स्कायरूट एरोस्पेस ही कंपनी स्थापन केली. अवघ्या आठ वर्षांत देशाचे पहिले खाजगी रॉकेट अवकाशात पाठवण्याचा चमत्कार त्यांनी केला. ही आहे भारतातील खरी ‘जेन झी क्रांती’. हे असे तरुण आहेत, जे कर्तृत्ववान आहेत. जे परिस्थितीला दोष देत बसत नाहीत. सरकारला दूषणे देत बसत नाहीत. सरकारकडून जी काही मदत मिळेल त्याचा वापर करून टॅलेंटच्या बळावर देशाला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवतात. पवन कुमार आणि नागा भरत डाका यांच्या टीमचे सरासरी वय जेमतेम २८ आहे. दोघांचा प्रवास इलॉन मस्क इतकाच थक्क करणारा आहे. २०१२ मध्ये पवन कुमार आणि नागा भरत डाका इस्रोमध्ये दाखल झाले. दोघांनी इस्रोतील विक्रम साराभाई स्पेस सेंटरमधून कारकीर्द सुरू केली. नागा भरत डाका हा फ्लाईट कम्प्युटर इंजिनिअर म्हणून काम करत होता. पवन कुमारने जीएसएलव्ही एमके ३, जीएसएलव्ही एमके-२, एसएसएलव्ही आधी प्रकल्पांवर डेप्युटी प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम पाहिले. दोघे एकत्र काम करत होते. त्यामुळे स्वाभाविकपणे ओळख झाली. मैत्री झाली. एकमेकांच्या स्वप्नांबाबत चर्चा झाली. दोघांच्या महत्त्वाकांक्षा भव्यदिव्य होत्या. अंतराळ क्षेत्रात काही भव्य घडवण्याचा संकल्प सोडून त्यांनी २०१८ मध्ये इस्रोला रामराम ठोकला. हे धाडस होते, कारण तोपर्यंत अंतराळ क्षेत्रात फक्त सरकारचा एकाधिकार होता. खाजगी कंपन्यांना काम करण्याची परवानगीच नव्हती. परंतु म्हणतात ना इच्छा तिथे मार्ग. २०२० मध्ये त्यांना देव पावला. मोदी सरकारने हे क्षेत्र खाजगी कंपन्यांसाठी खुले करण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकले. इन-स्पेस नावाची नोडल एजन्सी स्थापन केली

Exit mobile version