31 C
Mumbai
Monday, October 26, 2026
घरविशेषगृह, वित्त मंत्रालयाच्या इमारतीत धुराचे लोट

गृह, वित्त मंत्रालयाच्या इमारतीत धुराचे लोट

नॉर्थ ब्लॉकमध्ये लागलेल्या आगीवर नियंत्रण

Google News Follow

राजधानी दिल्लीतील महत्त्वाच्या प्रशासकीय इमारतींपैकी एक असलेल्या नॉर्थ ब्लॉकमध्ये सोमवारी (२६ ऑक्टोबर) आग लागल्याची घटना घडली. या इमारतीत केंद्रीय गृह मंत्रालय आणि वित्त मंत्रालयाची कार्यालये आहेत. इमारतीतून मोठ्या प्रमाणात धूर बाहेर येताना दिसल्याने परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच दिल्ली अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाने आग नियंत्रणात आणली असून, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

माहितीनुसार, सोमवारी सकाळी सुमारे ११ वाजून १० मिनिटांनी नॉर्थ ब्लॉकमधून धूर निघत असल्याची माहिती दिल्ली अग्निशमन दलाला मिळाली. त्यानंतर तातडीने सहा अग्निशमन गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या. इमारतीच्या छतावर दुरुस्ती आणि वेल्डिंगचे काम सुरू असताना ही घटना घडल्याचे प्राथमिक वृत्त आहे. छतावर बसवलेल्या एसी बॉयलरमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागल्याचा अंदाज अग्निशमन विभागाने व्यक्त केला.

हे ही वाचा:

वाराणसीच्या एअर शोदरम्यान लष्करी अधिकारी असल्याचा बनाव

गुजरातमध्ये भारतीय हद्दीत घुसलेल्या चार पाकिस्तानी मच्छीमारांना अटक

ब्राझीलमध्ये डाव्या विचारसरणीचे लुला दा सिल्व्हा चौथ्यांदा राष्ट्राध्यक्ष

नर्मदा नदीकाठी मतदार ओळखपत्रांचा खच

नॉर्थ ब्लॉक हा दिल्लीतील रायसीना हिल परिसरातील महत्त्वाचा प्रशासकीय भाग आहे. येथे केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या मंत्रालयांची कार्यालये असल्याने या इमारतीला विशेष सुरक्षा व्यवस्था असते. इमारतीच्या परिसरातून धूर बाहेर पडताना दिसल्याने घटनास्थळी तातडीने अग्निशमन आणि संबंधित यंत्रणांनी धाव घेतली.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा