29 C
Mumbai
Saturday, November 14, 2026
घरविशेष‘छावा’ला मागे टाकत ‘रामायण’ची बॉक्स ऑफिसवर विक्रमी झेप

‘छावा’ला मागे टाकत ‘रामायण’ची बॉक्स ऑफिसवर विक्रमी झेप

प्रदर्शनाच्या नवव्या दिवशी जगभरात १,१०० कोटींची कमाई

Google News Follow

अभिनेता रणबीर कपूरच्या ‘रामायण: पार्ट वन’ या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील घोडदौड सुरूच आहे. प्रदर्शनाच्या नवव्या दिवशी या चित्रपटाने विकी कौशलच्या ‘छावा’ चित्रपटाचा भारतातील कमाईचा लाइफटाइम विक्रम मोडला आहे. एवढेच नव्हे, तर जगभरातील कमाईने १ हजार १०० कोटी रुपयांचा टप्पाही पार केला आहे. त्यामुळे २०२६ मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये ‘रामायण’ने आपले स्थान मजबूत केले आहे.

चित्रपटाने नवव्या दिवशी भारतात ४७.८५ कोटी रुपयांची नेट कमाई केली. त्यामुळे देशांतर्गत एकूण नेट कमाई ६१२.४५ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. यापूर्वी ‘छावा’ने भारतात ६०१.५७ कोटी रुपयांची नेट कमाई केली होती. ‘रामायण’ने हा आकडा मागे टाकला आहे. याआधी चित्रपटाने शाहरुख खानच्या ‘पठाण’ (५४४.२८ कोटी) आणि रणबीरच्याच ‘ऍनिमल’ (५५६.३६ कोटी) या चित्रपटांचे कमाईचे विक्रमही मागे टाकले होते.

नवव्या दिवसाच्या कमाईत हिंदी आवृत्तीचा सर्वाधिक वाटा राहिला. हिंदीतून ३६.२५ कोटी, मल्याळममधून ३.२५ कोटी, कन्नडमधून ३ कोटी, तमिळमधून २.७५ कोटी आणि तेलुगूमधून २.६० कोटी रुपयांची कमाई झाली. भारतातील एकूण ग्रॉस कमाई ७३२.२० कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

हे ही वाचा:

हलाल मांस न विकण्यावरून लंडनमध्ये भारतीय रेस्टॉरंट मालकाला धमक्या

पश्चिम बंगाल आवास योजनेतील ‘घुसखोरां’ची सीआयडी चौकशी

नांदेडमध्ये सापडलेल्या पाकिस्तानी ब्युटी क्रीममध्ये विषारी पारा

राहुल गांधींकडे व्होट चोरीनंतर आता फोन टॅपिंगचा मुद्दा

परदेशातील बाजारपेठेतही चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. नवव्या दिवशी परदेशातून २५ कोटी रुपयांची कमाई झाली. त्यामुळे परदेशातील एकूण ग्रॉस कमाई ३७८.५० कोटी, तर जगभरातील एकूण ग्रॉस कमाई १ हजार ११०.७० कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा