महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने बुधवारी (२२ जुलै) दादर येथे विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक बांधिलकी जपत कॅन्सर रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना अन्नदान तसेच बूट पॉलिश करणाऱ्या कामगारांच्या मुलांना लाँग नोटबुकचे वाटप करण्यात येणार आहे.
बुधवारी दुपारी १२ वाजता गाडगेबाबा महाराज धर्मशाळा, दादर (भाजपा मुंबई कार्यालयाच्या शेजारी) येथे ५०० कॅन्सर रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी अन्नदानाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम, आमदार कालिदास कोळंबकर, आचार्य पवन त्रिपाठी, संजय ठाकूर, श्वेता परूळकर, नगरसेविका व शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री राजेश शिरवडकर तसेच ट्रस्ट संचालक प्रशांत देशमुख उपस्थित राहणार आहेत.
हे ही वाचा:
ब्रिटन सरकारमध्ये दोन भारतवंशीय मंत्री
११ कोटी ४८ लाखांच्या ऑनलाईन फसवणुकीचा पर्दाफाश
पंतप्रधान निवासाबाहेर राहुल-प्रियांकाचे धरणे आंदोलन; दिल्ली पोलिसांनी घेतले ताब्यात
AI सांगणार धारावीकरांना घर कधी मिळणार
त्यानंतर दुपारी १ वाजता वसंत स्मृती भाजपा मुंबई कार्यालय, दादर येथे बूट पॉलिश करणाऱ्या कामगारांच्या मुलांना लाँग नोटबुकचे वाटप करण्यात येईल. या कार्यक्रमाला संजय ठाकूर आणि श्वेता परूळकर उपस्थित राहणार आहेत.
या दोन्ही उपक्रमांचे आयोजन भाजपा मुंबई महामंत्री राजेश शिरवडकर आणि वॉर्ड १७२ अध्यक्ष भावेश तेलंगे यांनी केले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त समाजातील गरजू घटकांप्रती कृतज्ञता आणि सामाजिक उत्तरदायित्व व्यक्त करण्याचा हा प्रयत्न असल्याचे आयोजकांनी सांगितले.







