30 C
Mumbai
Sunday, November 29, 2026
घरविशेषभारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमीच्या राजकीय प्रवेशाची चर्चा

भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमीच्या राजकीय प्रवेशाची चर्चा

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांची घेतली भेट

Google News Follow

भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याच्या राजकीय प्रवेशाबाबत चर्चांना उधाण आले आहे. शमीने रविवारी नवी दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची भेट घेतली. या भेटीनंतर शमी लवकरच राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे, कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर काही आठवड्यांतच झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे. या बैठकीला भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष कुंवर बासित अली हेदेखील उपस्थित होते. मात्र, या भेटीत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

शमीच्या या भेटीला भाजपच्या अलीकडील राजकीय हालचालींचीही पार्श्वभूमी आहे. यापूर्वी भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल याला भाजपच्या राष्ट्रीय ओबीसी मोर्चाच्या कार्यकारिणीत विशेष निमंत्रित सदस्य म्हणून स्थान देण्यात आले होते. त्यानंतर आता शमीने भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांची भेट घेतल्याने क्रीडा क्षेत्रातील लोकप्रिय खेळाडूंना राजकीय व्यासपीठावर आणण्याच्या पक्षाच्या प्रयत्नांबाबत चर्चा सुरू झाली आहे. शमीची लोकप्रियता आणि देशभरातील चाहतावर्ग लक्षात घेता त्याच्या संभाव्य राजकीय भूमिकेला महत्त्व दिले जात आहे.

हे ही वाचा:
दीड लाख लोकांच्या उपस्थितीत पार पडले ‘राष्ट्रवंदनम’

विमान वाहतूक क्षेत्रात अदानी समूहाची मोठी झेप

झारखंडमध्ये भीषण अपघातात १३ भाविकांचा मृत्यू

म्युच्युअल फंडातील एसआयपी गुंतवणुकीत साडेतीन पट वाढ

यापूर्वी सप्टेंबर महिन्यात शमीने केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष जयंत चौधरी यांची भेट घेतली होती. त्या वेळीही त्याच्या राजकीय प्रवेशाच्या चर्चा रंगल्या होत्या. उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भेटीकडे विशेष लक्ष वेधले गेले होते. मात्र, राष्ट्रीय लोकदलाने शमीने अमरोहा येथील क्रीडा सुविधांसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानण्यासाठी ही भेट घेतल्याचे स्पष्ट केले होते. शमीचे मूळ गाव अमरोहा असल्याने उत्तर प्रदेशच्या राजकारणात त्याची संभाव्य भूमिका काय असेल, याबाबतही उत्सुकता आहे.

दरम्यान, ६ नोव्हेंबर रोजी शमीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. भारतासाठी ६४ कसोटी सामने खेळताना त्याने २२९ बळी मिळवले आहेत. मात्र, एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमध्ये खेळणे सुरू ठेवणार असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. सध्या तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये बंगालचे, तर आयपीएलमध्ये लखनौ सुपर जायंट्सचे प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे क्रिकेटमधील कारकीर्द अद्याप सुरू असतानाच त्याच्या राजकीय प्रवेशाच्या चर्चांनी जोर धरला आहे. मात्र, भाजपमध्ये प्रवेश किंवा निवडणूक लढवण्याबाबत शमीकडून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे त्याची ही भेट केवळ सदिच्छा भेट होती की राजकीय वाटचालीची सुरुवात, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
343,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा