32 C
Mumbai
Sunday, November 29, 2026
घरराजकारणपाठिंबा म्हणजे शरद पवारांकडून महाराष्ट्राचा घात

पाठिंबा म्हणजे शरद पवारांकडून महाराष्ट्राचा घात

उद्धव ठाकरेंची केंद्र सरकारवर टीका

Google News Follow

मतदारसंघ पुनर्रचना अर्थात डिलिमिटेशनच्या प्रस्तावावरून राजकीय वातावरण तापले असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या विधेयकाला तीव्र विरोध दर्शवला आहे. हे विधेयक मंजूर झाल्यास महाराष्ट्रासह देशाच्या राजकीय व्यवस्थेवर दूरगामी परिणाम होतील, असा इशारा त्यांनी दिला. पक्षाचे राजकीय हित पाहता विधेयकाला पाठिंबा देता आला असता; मात्र महाराष्ट्र आणि देशहितासाठी आपण विरोधाची भूमिका घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. इंडिया आघाडीतील सर्व पक्षांनी या मुद्द्यावर एकत्र येण्याचे आवाहनही त्यांनी केले.

उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांना डिलिमिटेशन विधेयकाबाबत आपल्या भूमिकेचा फेरविचार करण्याचे आवाहन केले. “शरद पवार हे मोठे नेते आहेत. शाहू, फुले, आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाण यांची विचारधारा मानणाऱ्यांनी महाराष्ट्राच्या आणि देशाच्या हिताचा विचार करायला हवा. पक्षाच्या हितापेक्षा राज्याचे हित मोठे असते. या विधेयकाच्या परिणामांचा विचार न करता त्याला पाठिंबा देण्याचा निर्णय कोणी घेत असेल, तर तो शंभर टक्के महाराष्ट्राचा घात ठरेल. महाराष्ट्रातील जनतेने खासदारांना राज्याचे हित जपण्यासाठी निवडून दिले आहे, महाराष्ट्राचे नुकसान करण्यासाठी नाही. उद्या लोकशाहीचा गळा घोटल्यानंतर अश्रू ढाळून काही उपयोग होणार नाही,” अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी शरद पवारांना सुनावले.

डिलिमिटेशनसाठी स्थापन करण्यात येणाऱ्या समितीच्या रचनेवरही ठाकरेंनी प्रश्न उपस्थित केले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, एक निवृत्त न्यायाधीश आणि ज्ञानेश कुमार यांनी नियुक्त केलेली अन्य एक व्यक्ती अशा स्वरूपाची समिती असणार असल्याचे त्यांनी सांगितले. या समितीत सरन्यायाधीश, पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेते यांचा समावेश असायला हवा, अशी मागणी त्यांनी केली. निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित होत असताना मतदारसंघांच्या सीमा निश्चित करण्याची जबाबदारी अशा समितीकडे देणे योग्य नसल्याचे ते म्हणाले.

हे ही वाचा:
दीड लाख लोकांच्या उपस्थितीत पार पडले ‘राष्ट्रवंदनम’

विमान वाहतूक क्षेत्रात अदानी समूहाची मोठी झेप

झारखंडमध्ये भीषण अपघातात १३ भाविकांचा मृत्यू

म्युच्युअल फंडातील एसआयपी गुंतवणुकीत साडेतीन पट वाढ

मतदारसंघांची पुनर्रचना करताना विरोधी पक्षांना अनुकूल असलेल्या भागांचे विभाजन करून राजकीय समीकरणे बदलण्याचा प्रयत्न होऊ शकतो, असा गंभीर आरोप त्यांनी केला. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील लोकसभा जागांमधील सध्याचे ३२ जागांचे अंतर वाढून ४८ होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. तसेच उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूमधील जागांचे अंतरही ४१ वरून ६१ होण्याचा दावा केला. सर्वाधिक कर देणाऱ्या महाराष्ट्राचे राजकीय प्रतिनिधित्व कमी होणार असेल, तर हा राज्यावर अन्याय असल्याचे त्यांनी म्हटले.

महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन या दोन विषयांची सांगड घालू नये, अशी भूमिकाही ठाकरेंनी मांडली. महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्यास आपला पाठिंबा असून, सध्याच्या ५४३ लोकसभा जागांमध्येच ते लागू करता येईल, असे ते म्हणाले. लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढवल्यास सरकारी खर्च किती वाढेल, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. २०१७ मधील मुंबई महापालिका प्रभाग पुनर्रचनेचा अनुभव सांगत त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या हेतूंवर संशय व्यक्त केला. त्यामुळे डिलिमिटेशनचा मुद्दा आता महाराष्ट्राचे राजकीय अस्तित्व आणि राज्यांच्या प्रतिनिधित्वाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरत आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
343,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा