32 C
Mumbai
Sunday, November 29, 2026
घरविशेषगंमतच...सौरव दासचे जन्मावेळचे नाव योगेश शर्मा

गंमतच…सौरव दासचे जन्मावेळचे नाव योगेश शर्मा

कॉक्रोच जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्याने मुलाखतीत दिली विचित्र माहिती

Google News Follow

कॉक्रोच जनता पार्टीचा सहसंयोजक सौरव दास याच्या नावाबद्दल वेगवेगळे दावे केले जातात. नुकतेच त्याला त्याचे जन्मस्थळ नेमके कोणते या प्रश्नामुळे लंडनला जाण्यापासून विमानतळावरच रोखण्यात आले. आता त्याच्या नावाची नवीच गंमत समोर आली आहे. जन्मावेळी आपले नाव वेगळे होते आणि आता वेगळे आहे, अशी माहिती त्याने इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत दिली आहे.

त्याच्या ओळखीवरून, पासपोर्टवरून आणि भारतीय नागरिकत्वावरून सुरू असलेल्या वादाला यामुळे नवे वळण मिळाले आहे. योगेश शर्मा नाव जन्माच्या वेळी देण्यात आले होते आणि कुंडलीत गुप्त नाव म्हणून त्याची नोंद करण्यात आली होती, असे दास याने स्पष्ट केले आहे. दरम्यान, महाराष्ट्र पोलिसांच्या विनंतीवरून त्याच्याविरोधात लूक आऊट सर्क्युलर (एलओसी) जारी करण्यात आल्याची माहिती केंद्र सरकारने दिल्ली उच्च न्यायालयात दिली आहे. तसेच, त्याच्या पासपोर्टमधील कथित तफावतींची चौकशी सुरू असून, त्याचा त्याच्या नागरिकत्वाच्या स्थितीवर परिणाम होऊ शकतो, असेही सरकारने न्यायालयाला सांगितले आहे.

हे ही वाचा:

मतदारसंघ पुनर्रचनेतून देशाला हुकूमशाहीकडे नेण्याचा भाजपचा प्रयत्न

दिलजीत दोसांझच्या मुंबईतील कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज सेवनाचा प्रकार

‘भारताची प्रगती, नारीशक्तीच्या स्वप्नांना नवे बळ’

सिक्कीमच्या रेल्वे कनेक्टिव्हिटीचा मार्ग मोकळा

एका मुलाखतीत बोलताना दासने सांगितले की, जन्माच्या वेळी त्यांचे नाव योगेश शर्मा ठेवण्यात आले होते, याची त्यांना यापूर्वी माहिती नव्हती. हा मुद्दा समोर आल्यानंतर त्यांनी आपल्या आईकडे विचारणा केली. त्यावेळी आईने हे हिंदू नाव जन्मविधीच्या वेळी ठेवण्यात आले होते आणि कुंडलीत गुप्त नाव म्हणून नोंदवले होते, अशी माहिती दिली. हे नाव सार्वजनिकरीत्या वापरले जात नसल्याचेही त्यांनी सांगितले.

हिंदू परंपरेत जन्माच्या वेळी ठेवलेले नाव आणि अधिकृत नाव वेगवेगळे असणे सामान्य आहे, असे दासने सांगितले. यासाठी त्याने सोनिया गांधी यांचे उदाहरण दिले. त्यांचे जन्माच्या वेळी ठेवलेले नाव आणि अधिकृत नाव वेगळे असल्याचा उल्लेखही त्यांनी केला. आपल्या कुटुंबातील खासगी गोष्टी सार्वजनिक झाल्यामुळे आईलाही आश्चर्य वाटल्याचे दासने सांगितले. या वादाचा संबंध आपल्या राजकीय कामाशी जोडताना, आपल्या चळवळीला विरोध करणारे लोक आंदोलनापासून लक्ष विचलित करण्यासाठी वैयक्तिक आयुष्याला लक्ष्य करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

मद्रास उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेनंतर हा वाद सुरू झाला. या याचिकेत दासचे खरे नाव योगेश शर्मा असल्याचा आणि त्याच्या कुटुंबाचे मूळ नेपाळशी संबंधित असल्याचा दावा करण्यात आला आहे. दासने आपली पार्श्वभूमी आणि नेपाळी मूळ लपवून आधार कार्ड आणि पासपोर्टसह भारतीय ओळखपत्रे फसवणुकीने मिळवल्याचा आरोप याचिकाकर्त्याने केला आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
343,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा