32 C
Mumbai
Sunday, November 29, 2026
घरविशेषसिक्कीमच्या रेल्वे कनेक्टिव्हिटीचा मार्ग मोकळा

सिक्कीमच्या रेल्वे कनेक्टिव्हिटीचा मार्ग मोकळा

सर्व १४ बोगद्यांचे खोदकाम पूर्ण

Google News Follow

हिमालयाच्या दुर्गम पर्वतरांगांमध्ये वसलेल्या सिक्कीम राज्याला लवकरच देशाच्या रेल्वे नेटवर्कशी जोडण्याचा मार्ग मोकळा होत आहे. सिक्कीममधील पहिल्या रेल्वे कनेक्टिव्हिटीसाठी सुरू असलेल्या शिवोक-रंगपो रेल्वे प्रकल्पातील सर्व १४ बोगद्यांचे खोदकाम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पातील सर्वात लांब असलेल्या ५.३ किलोमीटरच्या दहाव्या बोगद्याचे खोदकाम २७ नोव्हेंबर रोजी पूर्ण करण्यात आले. हा प्रकल्पाच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. हिमालयातील कठीण भौगोलिक परिस्थितीत अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने हे काम पूर्ण करण्यात आले आहे.

सुमारे ४५ किलोमीटर लांबीचा हा ब्रॉडगेज रेल्वे मार्ग पश्चिम बंगालमधील शिवोकपासून सिक्कीममधील रंगपोपर्यंत उभारण्यात येत आहे. या मार्गाचा जवळपास ८६ टक्के भाग बोगद्यांमधून जाणार आहे. प्रकल्पांतर्गत १४ बोगदे आणि २३ पूल उभारण्यात येत आहेत. शिवोक, रियांग, मेली आणि रंगपो अशी चार प्रमुख स्थानके या मार्गावर असतील. यामुळे सिक्कीमला पहिल्यांदाच थेट रेल्वे मार्गाने देशाच्या मुख्य रेल्वे नेटवर्कशी जोडता येणार आहे.

हे ही वाचा:
दीड लाख लोकांच्या उपस्थितीत पार पडले ‘राष्ट्रवंदनम’

विमान वाहतूक क्षेत्रात अदानी समूहाची मोठी झेप

झारखंडमध्ये भीषण अपघातात १३ भाविकांचा मृत्यू

म्युच्युअल फंडातील एसआयपी गुंतवणुकीत साडेतीन पट वाढ

सर्व बोगद्यांचे खोदकाम पूर्ण झाले असले, तरी रेल्वे सेवा सुरू करण्यापूर्वी बोगद्यांचे अंतर्गत काम, रेल्वे रुळांची उभारणी आणि सुरक्षा यंत्रणा बसविण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. रेल्वे मंत्रालयाने या प्रकल्पाचे काम डिसेंबर २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. सध्या सिक्कीममध्ये जाण्यासाठी प्रामुख्याने रस्ते वाहतुकीवर अवलंबून राहावे लागते. रेल्वे सुरू झाल्यानंतर प्रवाशांना अधिक सोयीस्कर पर्याय उपलब्ध होणार आहे.

या प्रकल्पामुळे सिक्कीममधील पर्यटन, व्यापार आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. पर्यटकांचा प्रवास सुलभ होण्यासोबतच मालवाहतुकीचा खर्च आणि वेळ कमी होण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे सिक्कीमसाठी हा रेल्वे प्रकल्प केवळ वाहतुकीचा पर्याय नसून राज्याच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाला गती देणारा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
343,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा