31 C
Mumbai
Tuesday, March 24, 2026
घरविशेषमहिलांना धमकी देऊन खरातकडून अघोरी कृत्ये... फडणवीसांनी सभागृहात दिली माहिती

महिलांना धमकी देऊन खरातकडून अघोरी कृत्ये… फडणवीसांनी सभागृहात दिली माहिती

आरोपी अशोक खरातला २९ मार्च पर्यंत पोलीस कोठडी

Google News Follow

Related

नाशिकमधील अशोक खरात प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आरोपी अशोक खरातला न्यायालयात हजर करण्यात आले असून त्याला २९ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथक (SIT) आणि क्राईम ब्रांचकडून केला जात आहे. तपासादरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर येत असून, आतापर्यंत सहा गुन्हे दाखल झाले आहेत. याशिवाय अनेक महिलांनी आरोपीविरोधात तक्रारी दिल्या आहेत. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विधानसभेत या प्रकरणावर भाष्य केले.

नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे महाराष्ट्रात खळबळ उडालेली असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली. आतापर्यंत सरकारकडून कोणती कारवाई करण्यात आली, याची सविस्तर माहिती त्यांनी सादर केली. अशोक खरात याच्या विकृत कृत्यांचा पाढाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत वाचला. या प्रकरणात पीडित महिलांची ओळख सुरक्षित ठेवून तपास कसा केला जात आहे आणि खरातच्या संपत्तीची चौकशी कशी होणार, याचा सविस्तर तपशीलही त्यांनी सादर केला.

अशोक खरात प्रकरणात आरोपीने महिलेचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पाच कोटी मागितले होते. या प्रकरणात नाशिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १८ फेब्रुवारी रोजी नीरज जाधव याने एआय फोटो व्हायरल केला नंतर डिलीट केला. त्यामुळे संबंधित महिलेला नीरज जाधवच्या विरोधात पुरावा देता आला नाही. परंतु या प्रकरणातील पीडित महिलांना विश्वासात घेऊन, त्यांचे समुपदेशन करून, कोणतीही ओळख सार्वजनिक न करता गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणात एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. त्या माध्यमातून तपास सुरू आहे.

⁠सरकार वाडा पोलीस स्टेशनमध्ये एका महिलेने तक्रार केली. ⁠या महिलेला गुंगीचे औषध देऊन, तिच्या नवऱ्याला मारून टाकेन अशी धमकी देत वारंवार बलात्कार करण्यात आला. अशोक खरात हा महिलांना संमोहित करायचा. विधीच्या नावाखाली त्यांच्या पोटावरून हात फिरवायचा, त्यांच्या योनीत बोट घालायचा. तीर्थाच्या नावाखाली त्यांना लघवी पाजायचा. तसेच आपण दैवी अवतार असल्याचं सांगत या प्ररकरणाची वाच्यता कुठे केल्यास दैवी कोप होईल अशी धमकी द्यायचा. तसेच या गुन्ह्याचा प्राथमिक तपास करत असताना सहा लाख रोकड, दोन लॅपटॉप जप्त करण्यात आले. ⁠डीव्हीआर, रिव्हॉल्वर, जिवंत काडतुसे आणि फायर केलेले पाच काडतुसे मिळाली. त्यानुसार १७ मार्च रोजी आरोपीला अटक करण्यात आली.

हे ही वाचा:

‘लँड फॉर जॉब’ प्रकरणात लालू यादवांविरोधातील गुन्हा रद्द करण्यास नकार

सोने-चांदी दरात घसरण; गुंतवणूकदार सतर्क

ग्रीन एनर्जीमुळे तांब्याची मागणी वाढ

८ वर्षांच्या मुलीवर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या मौलवी मोहम्मद इस्माईलला चोपले

अशोक खरातची ३३ एकर जमीन, फार्म हाऊस, आणि इतर ठिकाणी जमिनी, फ्लॅट, पनवेल येथील जमीन, मुलीच्या नावावर असलेला पुण्यातील फ्लॅट, सिन्नर येथे मंगल कार्यालय जप्त करण्यात आलं आहे. आतापर्यंत ४० कोटी रुपयांची मालमत्ता समोर आली आहे. तसेच अशोक खरातच्या ⁠नातेवाईकांच्या नावावर असलेली मालमत्ता या संदर्भात चौकशी सुरु आहे.

आपण दैवी अवतार असल्याचं सांगत अशोक खरातने महिलांचे शोषण केलं, तसेच कुटुंबियांच्या सुरक्षिततेबद्दलची धमकी देऊन, सापाची भीती दाखवून या पीडितांवर बलात्कार केला, त्यांच्या योनीत बोट घालत अत्याचार केला, महिलांना तीर्थाच्या नावाखाली लघवी पाजली, अशी अघोरी कृत्ये खरात याने केल्याची धक्कादायक माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला दिली. या प्रकरणात एकूण आठ गुन्हे दाखल असून अशोक खरातला ज्यांनी कुणी मदत केली त्या कुणालाही सोडण्यात येणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. या प्रकरणात आणखी तपास सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
300,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा