फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी हा भारत दौऱ्यावर असताना त्याने कोलकात्याच्या सॉल्ट लेक स्टेडियमवर उपस्थिती लावली. यावेळी मेस्सीच्या कमी वेळासाठीच्या उपस्थितीमुळे या GOAT टूर कार्यक्रमादरम्यान मैदानावर मोठा गोंधळ उडाला. संतप्त प्रेक्षकांनी खुर्च्या, बाटल्या मैदानात फेकल्या. या गोंधळाच्या घटनेची चौकशी करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. यानंतर पश्चिम बंगालचे क्रीडा मंत्री अरुप बिस्वास यांनी राजीनामा दिला आहे.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना लिहिलेल्या हस्तलिखित पत्रात, गोंधळाबद्दल बरीच टीका झालेल्या बिस्वास यांनी म्हटले आहे की, या घटनेची मुक्त आणि निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी ते राजीनामा देत आहेत. शनिवारी मेस्सीचा भारत दौरा गोंधळात सुरू झाला. प्रेक्षकांनी १५,००० रुपयांच्या तिकिट्स खरेदी करूनही त्यांना मेस्सीची झलक पाहायला मिळाली नाही यामुळे संताप निर्माण झाला. प्रेक्षकांचा आरोप आहे की मेस्सी प्रभावशाली व्यक्ती आणि बिस्वास सारख्या राजकारण्यांच्या गटाने वेढलेला होता. संतप्त प्रेक्षकांनी बाटल्या आणि खुर्च्या फेकण्यास सुरुवात करून मैदानात तोडफोड केली.
गोंधळानंतर लगेचच, ममता बॅनर्जी यांनी घटनेची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्याचे आदेश दिले. कार्यक्रमाचे मुख्य आयोजक सतद्रु दत्ता यांनाही त्याच दिवशी अटक करण्यात आली. दरम्यान, बंगालच्या मुख्य सचिवांनी स्टेडियममधील कथित गैरव्यवस्थेबद्दल डीजीपी राजीव कुमार, सीपी बिधाननगर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली.
हे ही वाचा:
“रामाचे नाव जोडण्यात काय अडचण आहे?”
प्रदूषण रोखण्यासाठी दिल्लीत तंदूरवर बंदी
जागतिक AI रँकिंगमध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर; एका वर्षात चार स्थानांनी घेतली झेप
कांदिवलीत मोबाईल चोरीच्या आरोपीचा पोलिसांवर हल्ला
या घटनेसंदर्भात सोमवारी पाच जणांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम १३२ (पोलिस अधिकाऱ्यावर हल्ला करणे), सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा आणणे, कलम ३२४(५) (सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे) आणि कलम ३(५) (संयुक्त गुन्हेगारी दायित्व) यासह पश्चिम बंगाल सार्वजनिक सुव्यवस्था देखभाल (MPO) कायदा आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक (PDPP) कायद्याच्या संबंधित तरतुदींसह संबंधित कलमांखाली आरोप ठेवण्यात आले आहेत.







