31 C
Mumbai
Wednesday, August 19, 2026
घरविशेषसकाळी १० वाजले तरी ऑफिस रिकामं! बंगळुरूच्या ट्रॅफिकला कंपन्या हैराण

सकाळी १० वाजले तरी ऑफिस रिकामं! बंगळुरूच्या ट्रॅफिकला कंपन्या हैराण

वाहतूक कोंडीवर स्टार्टअप संस्थापकाचा संताप

Google News Follow

Related

देशाची ‘सिलिकॉन व्हॅली’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंगळुरूमधील वाहतूक कोंडीचा फटका आता थेट कामाच्या उत्पादकतेलाही बसत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. सकाळी १०.१५ वाजता कार्यालयातील निम्म्याहून अधिक खुर्च्या रिकाम्या असल्याचा फोटो एका स्टार्टअप संस्थापकाने लिंक्डइनवर शेअर केला. कर्मचाऱ्यांच्या उशिरामागे त्याने शहरातील प्रचंड ट्रॅफिकला जबाबदार धरले आहे.

अप्लाइड एआय स्टुडिओ आणि अप्लाइड एआय क्लबचे संस्थापक बाला पन्नीरसेल्वम यांनी हा फोटो शेअर केला. कार्यालयात कर्मचारी वेळेवर पोहोचत नसल्याची समस्या लोकांच्या काम करण्याच्या इच्छेमुळे नव्हे, तर कार्यालयात पोहोचण्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रचंड कसरतीमुळे निर्माण होत असल्याचे त्यांनी म्हटले.

पन्नीरसेल्वम यांच्या मते, बंगळुरूमधील एचएसआर परिसरातील अवघ्या ४ किलोमीटरच्या प्रवासासाठी दुचाकीवर सुमारे २० मिनिटे, तर कारने जवळपास ३० मिनिटे लागतात. गर्दीच्या वेळेत हा प्रवास आणखी लांबतो. सिग्नल तोडणाऱ्या दुचाकीस्वारांपासून वाचत, वाहतुकीतून मार्ग काढत कार्यालयात पोहोचेपर्यंत कर्मचारी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या थकलेले असतात, असे त्यांनी सांगितले.

याचा परिणाम संध्याकाळच्या प्रवासावरही होतो. संध्याकाळी ६ नंतर कार्यालयातून निघाल्यास घरी पोहोचण्यासाठी दुप्पट वेळ लागू शकतो, तर ५ वाजता निघणारे कर्मचारीही घरी पोहोचेपर्यंत पूर्णपणे थकून जातात. त्यामुळे वैयक्तिक आयुष्यावर परिणाम होतो आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा उशिरा कार्यालयात पोहोचण्याची शक्यता वाढते, असा दावा त्यांनी केला.

हे ही वाचा:

जेन झीला आकर्षित करण्यासाठी सरकारी बँकांनी ‘कूल’ व्हावे

भारतीय कार बाजाराला वेग! FY31 पर्यंत ६३ लाख वाहनांची विक्री शक्य

आयएसआय कनेक्शन असलेल्या वहाब आलमच्या तिसऱ्या साथीदाराला बेड्या

भारतीय कंपन्यांची विदेशात झेप! जुलैमध्ये गुंतवणूक १७% वाढून ५.७ अब्ज डॉलर

पन्नीरसेल्वम यांनी स्वतःचा अनुभवही सांगितला. पावसासारखा कोणताही अडथळा नसताना व्हाइटफिल्ड ते एचएसआरमधील १७ किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी त्यांना दुपारी ४ वाजता तब्बल २ तास लागले. त्यांच्या या पोस्टवर बंगळुरूकरांनी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया दिल्या असून, अनेकांनी स्वतःचे वाहतूक कोंडीचे अनुभव शेअर केले. त्यामुळे बंगळुरूतील ट्रॅफिकची समस्या केवळ रोजच्या प्रवासापुरती मर्यादित नसून कर्मचाऱ्यांची उत्पादकता, मानसिक ऊर्जा आणि कामाच्या गुणवत्तेवरही परिणाम करत असल्याची चर्चा पुन्हा ऐरणीवर आली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
328,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा