31 C
Mumbai
Wednesday, December 10, 2025
घरविशेषसमृद्धी महामार्गावर बस आणि ट्रकच्या अपघातात १२ जणांचा मृत्यू

समृद्धी महामार्गावर बस आणि ट्रकच्या अपघातात १२ जणांचा मृत्यू

अपघातात २० जण जखमी

Google News Follow

Related

समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच असून शनिवारी मध्यरात्री समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगरजवळ भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये १२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, २० जण जखमी आहेत. मिनी बस आणि ट्रकमध्ये हा भीषण अपघात झाला.

समृद्धी महामार्गावर बसच्या पुढे एक ट्रक चालत होता. मात्र, जांबरगाव टोलनाक्याजवळ ट्रकला अचानकपणे एका आरटीओच्या पथकाने हात दाखवत थांबण्याचा इशारा केला. त्यानंतर ट्रक चालकाने जागेवरच ब्रेक मारला. त्यामुळे मागून येणाऱ्या ट्रॅव्हल्स बस चालकाला काही कळण्याच्या आता वेगाने येणारी ट्रॅव्हल्स बस ट्रकवर जाऊन धडकली. हा अपघात एवढा भीषण होता की, ट्रॅव्हल्स बसच्या पुढच्या भागाचा अक्षरशः चुराडा झाला आहे. मध्यरात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. या अपघातात बसचा ड्रायव्हर थोडक्यात बचावला आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

समृद्धीवरील टोल नाक्याजवळ एक ट्रक अचानक समोर आल्याची माहिती अपघातातील बस ड्रायव्हरने दिल्याची माहिती पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे यांनी दिली आहे. ट्रक कमी वेगात होता की थांबला होता याबाबतचा तपास पोलीस करत आहेत. समृद्धी टोल नाक्यावर आरटीओने हा ट्रक थांबवला होता अशीही माहिती आहे. याबाबत सविस्तर चौकशी करुन गुन्हा दाखल केला जाईल अशी माहिती पोलीस अधीक्षक मनीष कलवाणीया यांनी दिली आहे.

हे ही वाचा:

भारतापुढे पाकिस्तानची दाणादाण, भारताचा आठवा वर्ल्डकप विजय

बोगस पासपोर्ट प्रकरणी सीबीआयचे ५० ठिकाणी छापे

इतिहास घडणार; छत्तीसगडमध्ये ‘बुलेट’वर ‘बॅलेट’चे यश

जयपूरमधील १०० खासगी लॉकरमध्ये ५०० कोटी आणि ५० किलो सोने

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करुन संभाजीनगरच्या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. अपघाताच्या वृत्ताने अतिशय दु:ख झाले असून मृतांच्या कुटुंबीयांबद्दल मी सहवेदना व्यक्त करतो. तसेच, जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो. प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली असून मदत आणि बचावकार्य सुरू असल्याचेही मोदींनी ट्विटमध्ये म्हटले. तर, मृतांच्या वारसांना पंतप्रधान फंडातून २ लाख तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा