31 C
Mumbai
Wednesday, January 14, 2026
घरविशेष१५ उपग्रह हरवले पण ‘KID’ बचावला; तीन मिनिटे अवकाशातून पाठवली माहिती

१५ उपग्रह हरवले पण ‘KID’ बचावला; तीन मिनिटे अवकाशातून पाठवली माहिती

इस्रोच्या PSLV- C62 मोहिमेतील आश्चर्यकारक घटना

Google News Follow

Related

इस्रोच्या PSLV- C62 प्रक्षेपण वाहनाने अनेक देशांचे आणि भारतीय कंपन्यांचे उपग्रह गमावले. मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्यात आलेल्या अपयशानंतर १६ उपग्रह नष्ट झाले होते. यानंतर सर्वच स्तरावरून निराशा व्यक्त केली जात होती. अशातच आता आश्चर्यकारक अशी माहिती समोर आली आहे.

इस्रोने पाठवलेले १६ पैकी १५ उपग्रह अवकाशात हरवले असले तरी यातून एक उपग्रह बचावला आहे. KID (केस्ट्रेल इनिशियल डेमॉन्स्ट्रेटर) नावाचा फुटबॉल आकाराचा स्पॅनिश उपग्रह या अपघातातून वाचला. त्याने फक्त तीन मिनिटांसाठी “महत्वपूर्ण डेटा” पृथ्वीवर पाठवला. तिसऱ्या टप्प्यातील विसंगतीमुळे मोहीम अयशस्वी झाली असली तरी २५ किलोग्रॅम वजनाचा उपग्रह पीएसएलव्हीच्या दुर्दैवी अपघातातून बचावला. उपग्रहाचे विकासक, ऑर्बिटल पॅराडाइम यांनी एक्स वर म्हटले की, “आमचे KID कॅप्सूल. PSLV- C62 पासून वेगळे झाले, चालू झाल आणि डेटा प्रसारित केला” पूर्ण अहवाल लवकरच येईल, असे कंपनीने म्हटले आहे. ऑर्बिटल पॅराडाइमने अद्याप पुष्टी केलेली नाही की, कॅप्सूल नंतर जळून खाक झाला की पृथ्वीवर पडला.

फ्रेंच भागीदार RIDE सोबत विकसित केलेले, KID ऑर्बिटल पॅराडाइमच्या पुनर्वापरयोग्य री-एंट्री तंत्रज्ञानाचे प्रमाणीकरण करते, जे भविष्यातील उपग्रह सेवा आणि डी-ऑर्बिटिंगसाठी महत्त्वपूर्ण आहे. स्टार्टअप लवकरच एक सविस्तर अहवाल तयार करणार आहे आणि केस्ट्रेलच्या पूर्ण-स्तरीय विकास कार्यक्रमाला गती देण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा..

“मुख्यमंत्री पदाच्या मुद्द्यावर स्पष्टीकरण द्या”

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचे वाजले बिगुल! ५ फेब्रुवारीला मतदान

दहशतवादी संबंधांच्या आरोपावरून पाच ५ सरकारी कर्मचारी निलंबित

रशियन तेल टँकरमधून अटक केलेल्या तीन भारतीयांची सुटका

तिसऱ्या टप्प्यात एका विसंगतीमुळे रॉकेट त्याच्या उड्डाण मार्गावरून वळले, ज्यामुळे सूर्य-समकालिक कक्षेत त्याचा प्रवेश करण्यास अडथळा निर्माण झाला आणि PSLV ची दुर्दैवी घटना घडली. इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी सोमवारी सांगितले की, “तिसऱ्या टप्प्याच्या शेवटी, आम्हाला यानमध्ये काही गोंधळ दिसून आला आणि त्याच्या उड्डाण मार्गात काही बदल आढळले. परिणामी, मोहीम अपेक्षेप्रमाणे पुढे जाऊ शकली नाही.” त्यांच्या विधानानंतर, असे गृहीत धरण्यात आले की राष्ट्रीय सुरक्षा आणि देखरेखीसाठी डीआरडीओने विकसित केलेला हायपरस्पेक्ट्रल अर्थ इमेजिंग उपग्रह, प्राथमिक पेलोड ईओएस-एन१ (अन्वेषा) यासह सर्व १६ उपग्रह हरवले आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
287,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा