23.9 C
Mumbai
Wednesday, January 21, 2026
घरविशेषठाणे-मेट्रो रेल्वे प्रकल्पास गती, शेतकऱ्यांना कापूस-सोयाबीन अनुदान वितरण सुरू!

ठाणे-मेट्रो रेल्वे प्रकल्पास गती, शेतकऱ्यांना कापूस-सोयाबीन अनुदान वितरण सुरू!

मंत्रिमंडळाच्या बैठकीत ३८ निर्णय

Google News Follow

Related

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज (३० सप्टेंबर) राज्य मंत्री मंडळाची महत्वाची बैठक पार पडली. यामध्ये ठाणे-मेट्रो रेल्वे प्रकल्पास गती, होमगार्डांच्या भत्यात वाढ, असे एकूण ३८ मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. राज्यातील कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना २०२३च्या खरीप हंगामासाठीचे अनुदान वितरणाचा शुभारंभ देखील आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आला.

-राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचे निर्णय 

१) कोतवालांच्या मानधनात दहा टक्के वाढ. अनुकंपा धोरणाही लागू-(महसूल विभाग)

२) ग्राम रोजगार सेवकांना आता दरमहा ८ हजार रुपये मानधन तसेच प्रोत्साहन अनुदान-(नियोजन विभाग)

३) ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भुयारी मार्गाच्या कामाला गती देणार. एमएमआरडीए ला बिनव्याजी दुय्यम कर्ज सहाय्य देण्यास मान्यता-(नगर विकास विभाग)

४) ठाणे वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कामास गती देणार. १२ हजार २०० कोटींच्या सुधारित आराखड्यास मान्यता
(नगर विकास विभाग)

५) ठाणे ते बोरिवली भुयारी मार्गासाठी १५ हजार कोटी कर्जरूपाने उभारणार-(नगर विकास विभाग)

६) देशी गाईंच्या पालन पोषणासाठी अनुदान योजना-(पशुसंवर्धन विभाग)

७) भारतीय खेळ प्राधिकरणाला आकुर्डी, मालाड व वाढवण येथील जागा नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स उभारणार
(क्रीडा विभाग)

८) रसायन तंत्रज्ञान संस्थेस ठाणे येथील मौजे खिडकाळीची जागा-(महसूल विभाग)

९) राज्य जलसंपत्ती माहिती केंद्र स्थापणार. जलस्त्रोतांचे उत्तम नियोजन करणार-(जलसंपदा विभाग)

१०) जळगाव जिल्ह्यातल्या भागपुर उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता. ३० हजार हेक्टर जमीन सिंचित होणार
(जलसंपदा विभाग)

११) लातूर जिल्ह्यातील हासाळा, उंबडगा, पेठ, कव्हा कोल्हापूर बंधाऱ्याच्या कामास मान्यता-(जलसंपदा विभाग)

१२) धुळ्याच्या बीएपीएस स्वामीनारायण संस्थेस ग्रामस्थांच्या विकासासाठी जमीन-(महसूल विभाग)

१३) रमाबाई आंबेडकर नगर, कामराजनगरच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला गती देणार. एमएमआरडीए ला जमीन अधिमूल्य भरण्यास सवलत-(नगर विकास विभाग)

१४) केंद्राच्या मिठागराच्या जमिनी राज्य शासनाकडे हस्तांतरित करणार. दुर्बलांसाठी घरांच्या योजनांना वेग येणार
(गृहनिर्माण विभाग)

१५) पालघर जिल्ह्यातील मुरबे येथे बहुउद्देशीय बंदर प्रकल्प जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चर विकासक-(बंदरे विभाग)

१६) धारावीतल्या अपात्र झोपडीधारकांसाठी परवडणारी भाडेतत्त्वावरील घरे योजना. धारावी पुनर्वसन प्रकल्पावर जबाबदारी-(गृहनिर्माण विभाग)

१७) सेवानिवृत्ती उपदान, मृत्यू उपदानाची मर्यादा वाढवून २० लाख-(वित्त विभाग)

१८) अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी कृषी स्वावलंबन योजनेचे आर्थिक निकष वाढवले
अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ होणार-(कृषी विभाग)

१९) सोनार समाजासाठी संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ-(इतर मागास बहुजन कल्याण)

२०) जामखेडच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सूत गिरणीला अर्थसहाय्य करणार-(इतर मागास बहुजन कल्याण)

२१) राज्यातील होमगार्डांच्या भत्त्यात भरीव वाढ. सुमारे ४० हजार होमगार्डना लाभ-(गृह विभाग)

२२) नाशिकचे वैद्यकीय पदवी महाविद्यालय व रुग्णालय शासनाच्या अखत्यारीत घेणार-(वैद्यकीय शिक्षण)

२३) आयुर्वेद, युनानी महाविद्यालयातील पदभरतीसाठी निवड समिती-(वैद्यकीय शिक्षण)

२४) राज्यातील आणखी २६ आयटीआय संस्थांचे नामकरण-(कौशल्य विकास)

२५) आर्य वैश्य समाजासाठी श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळ-(नियोजन विभाग)

२६) श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर समितीवरील सदस्यांची संख्या वाढवून १५-(विधी व न्याय विभाग)

२७) अधिसंख्य कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा तांत्रिक खंड क्षमापित-(सामान्य प्रशासन विभाग)

२८) बार्टीच्या धरतीवर वनार्टी स्वायत्त संस्था-(इतर मागास बहुजन कल्याण)

२९) मेट्रो तीन प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी मुद्रांक शुल्कात सवलत-(महसूल विभाग)

३०) जिल्हा परिषदेतील २००५ नंतर रुजू कर्मचाऱ्यांना एक वेळ पर्याय-(ग्रामविकास विभाग)

३१) पंचगंगा नदी प्रदूषणासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प अद्यावत करणार-(उद्योग विभाग)

३२) राज्यात विशेष शिक्षक पदाची निर्मिती. ४८६० पदे-(शालेय शिक्षण)

३३) शासन हमी शुल्काचा दर कमी करण्याचा निर्णय. हमी शुल्क माफी मिळणार नाही-(वित्त विभाग)

३४) अवयवदान व अवयव प्रत्यारोपणासाठी यंत्रणा. जनजागृतीवर भर-( वैद्यकीय शिक्षण विभाग)

३५) माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा दुसरा तिसरा अहवाल स्वीकारला-( सामान्य प्रशासन विभाग)

३६) राज्यातील सैनिकी शाळांसाठी आता सुधारित धोरण-(शालेय शिक्षण)

३७) डाळिंब, सीताफळ इस्टेट उभारणार उत्पादकांना मोठा लाभ-(कृषी विभाग)

३८) महसुली उत्पन्न वाढवण्यासाठी मुद्रांक अधिनियमात सुधारणा-(महसूल विभाग)

हे ही वाचा : 

अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर!

मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर अमित शहांचा प्रहार !

धारावीतील मशिदीचे अनधिकृत बांधकाम काढण्यास सुरुवात!

जम्मू- काश्मीरमध्ये आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या २३ सरकारी अधिकाऱ्यांचे निलंबन

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
287,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा