पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज ७५ वा वाढदिवस असून देशासह परदेशातून सुद्धा त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी दिली प्रतिक्रिया दिली. “पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखा निर्णायक नेता देशाला लाभला आहे, हे भारताचे खरे भाग्य आहे,” असे मत केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी व्यक्त केले. ” पंतप्रधान मोदी १४० कोटी भारतीयांची काळजी घेतात आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून भारताला महासत्ता बनवण्याचे स्वप्न पाहतात. हा एक महत्त्वाचा क्षण आहे, त्यांच्या विविध संदेशांचा प्रसार करण्याचा.”
गोयल पुढे म्हणाले, “पंतप्रधान मोदींचा स्वच्छतेचा संदेश असो, उच्च प्रामाणिकतेचा संदेश असो, सुशासनाचा संदेश असो, की समावेशक विकास व वंचितांप्रती संवेदनशीलतेचा (संवेदनशीलता) संदेश, हे सर्व देशाने आत्मसात करण्याची ही योग्य वेळ आहे.” “मला पूर्ण विश्वास आहे की त्यांच्या नेतृत्वाखाली भारत अमृतकाळात ‘विकसित भारत, विकसित राष्ट्र’ म्हणून २०४७ पर्यंत निश्चितच उभा राहील,” असे आशावादी मत त्यांनी व्यक्त केले.
एएनआयशी संवाद साधताना ते म्हणाले, “पंतप्रधान मोदी आज जगातील सर्वात लोकप्रिय, परिवर्तन घडवणारे आणि विश्वासार्ह नेते आहेत. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पुढील १५ दिवस ‘सेवा पंधरवडा’ म्हणून साजरा केला जात आहे. पंतप्रधान मोदी कधीच त्यांच्या वाढदिवसाचा उत्सव साजरा करू देत नाहीत, कारण त्यांच्यासाठी समाजसेवा आणि देशसेवा हाच खरा उत्सव आहे. गरिबांपर्यंत मदत पोहोचवणे, देशाला प्रगतीच्या आणि समृद्धीच्या वाटेवर घेऊन जाणे, जे काही साध्य झाले आहे त्यावर समाधानी न राहता अधिक मोठी उद्दिष्टं गाठण्यासाठी धडपड करत राहणे हीच त्यांच्या पन्नास वर्षांच्या निष्कलंक सार्वजनिक जीवनाची ओळख आहे.”
हे ही वाचा :
“राजकारणात मोदींची एन्ट्री: एक प्रेरणादायक प्रवास”
समर्पणाचे प्रतीक असलेल्या पंतप्रधानांना शुभेच्छा! काय म्हणाले देशभरातील नेते?
अमेरिकेला दोहा हल्ल्याबद्दल आधीच माहिती होती! काय सांगतोय अहवाल?
नरेंद्र मोदींना शुभेच्छा देण्यासाठी ट्रम्प यांचा कॉल; रशिया युक्रेन युद्धावर काय केले भाष्य?
त्यांनी यावर भर दिला की, “पंतप्रधान मोदींनी गेली ५० वर्षे समाज आणि राष्ट्रासाठी निष्कलंक सेवा केली आहे. पंतप्रधान मोदींना आतापर्यंत २७ आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाले आहेत, जे कदाचित कोणत्याही आंतरराष्ट्रीय नेत्याला मिळालेल्या सर्वाधिक पुरस्कारांपैकी आहेत. देशभरातच नव्हे तर जगभरात त्यांच्यावर प्रेम करणारे लोक आहेत.”
गोयल यांनी मोदींसोबत काम करण्याचा अनुभव सांगताना म्हटले, “त्यांच्यासोबत काम करणे, त्यांच्याकडून शिकणे — जसे की अधिक संवेदनशील कसं व्हायचं, परिणामांवर लक्ष केंद्रित कसं ठेवायचं, योजनांची अंमलबजावणी प्रामाणिकपणे कशी करायची, आणि प्रत्येक प्रकल्प त्याच्या अंतिम ध्येयापर्यंत कसा पोहोचवायचा, हे सगळं शिकणं ही माझ्यासाठी एक विशेष सुसंधी ठरली आहे.”







