25 C
Mumbai
Sunday, December 7, 2025
घरविशेषस्वातंत्र्यवीरांना जुंपलेल्या कोलूतून अडीच किलो शेंगदाण्याचे तेल काढताना लागले दोन तास...

स्वातंत्र्यवीरांना जुंपलेल्या कोलूतून अडीच किलो शेंगदाण्याचे तेल काढताना लागले दोन तास…

दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात ७२ वर्षीय नाईक यांनी घेतला कष्टप्रद अनुभव

Google News Follow

Related

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना अंदमानात कोलूला जुंपून तेल काढण्याची अमानवीय शिक्षा देण्यात आली होती. यात तात्यारावांना काय यातना भोगाव्या लागल्या असतील, त्याचा अनुभव मला आला. कोलू फिरवताना बेड्यांमुळे होणारा त्रास लक्षात घेता स्वातंत्र्यवीर सावरकरांनी तेथे हा भयावह त्रास कसा सहन केला असेल त्याची अनुभूती मिळाली, असे उद्गार ७२ वर्षांच्या प्रमोद नाईक यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात बोलताना काढले.

दादरच्या शिवाजी उद्यानासमोरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात दर्शनी भागातच अंदमानच्या तुरुंगाची प्रतिकृती आहे. त्या ठिकाणी ब्रिटिशांनी कैद्यांना तेल काढण्यासाठी कोलू ओढण्यासाठी दिलेल्या अमानवीय अशा शिक्षेबद्दल लोकांना प्रचिती यावी, यासाठी ठेवलेली कोलूची प्रतिकृती आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांना जसे तेल काढण्यासाठी ब्रिटिशांनी अंदमानात कोलूला जुंपले. उन्हात, पावसात अशी शिक्षा दिली होती. त्याचा अनुभव घेण्यासाठी प्रमोद नाईक यांनी सावरकर स्मारकाला कोलू फिरवण्यास अनुमती देण्याची विनंती केली होती. त्यानुसार रविवारी ९ एप्रिल २०२३ या दिवशी त्यांनी सावरकर स्मारकात येऊन हा अनुभव घेतला.

हे ही वाचा:

लिट्टेला सक्रिय करण्याचा कट , एनआयएची छापेमारी, मोठ्या प्रमाणावर रोकड ,ड्रग्ज जप्त

पावसापासून बचाव करण्यासाठी ते शेडखाली उभे होते, पण झाडाने जीव घेतला

आल्प्स पर्वतरांगांमध्ये हिमस्खलनात चार जणांचा मृत्यू, अडकलेले बहुतांश गिर्यारोहक

हिंदुत्वाची ऍलर्जी असणाऱ्यांची दुकाने बंद होतील!

प्रथम त्यांनी बेड्या घालून कोलू ओढण्याचा प्रयत्न नाईक यांनी केला, मात्र त्यांच्या पँटवरूनही त्या बेड्यांमुळे कासले गेल्याने त्यांनी बेड्या काढून कोलू ओढला. त्यासाठी त्यांनी ५ किलो शेंगदाणे घेतले होते. त्यापैकी अडीच किलो शेंगदाणे कोलूमध्ये टाकले. कोलूला असलेला दांडा उचलणेही कठीण असून त्यासाठी दोन माणसे लागतात, हे त्यांना लक्षात आले. तर सुमारे दोन ते अडीच तास त्यांनी थांबत थांबत कोलू चालवून शेंगदाणे बारीक केले. सावरकर स्मारकात हा कोलू आता उन्हात ठेवलेला नाही. मात्र तरीही या सध्याच्या उन्हाळ्याचा त्रास आणि कोलू ओढण्याची कृती यातून माणसाच्या अंगातून घामाच्या धारा तर निघतातच पण त्याशिवाय ताकद लावायला लागते, गोल फिरवत चक्करा मारा्या लागतात. आपण मध्ये मध्ये थांबून हा प्रयत्न केला मात्र नंतर दमल्याने तेथेच पथारी टाकून पडलो. त्यानंतर सावरकर स्मारकाच्या कर्मचाऱ्यांनी मला आतमध्ये नेऊन विश्रांती घेण्याची व्यवस्था केली. काही काळानंतर विश्रांती घेतली आणि पुन्हा कोलू चालवण्यासाठी आलो पण पाय जडावले होते यामुळे काम थांबवले.

यातून तेल निघण्यासाठी पांढरे नव्हे तर लाल शेंगदाणे वापरावे लागतात, असे तेथे आलेल्या एका तेल घाण्याच्या व्यावसायिकाने सांगितल्याने मी पांढरे शेंगदाणे टाकून जो प्रयत्न केला त्यातून आणखी वेळ जाणार हे नक्की झाले. मात्र त्यानंतर काही आपल्याला कोलू ओढवला नाही, असे सांगत प्रमोद नाईक यांनी तात्याराव सावरकर यांनी अंदमानात किती भीषण व भयावह त्रास सहन केला असेल, त्याची कल्पना करणेही कठीण असल्याचे स्पष्ट केले.   प्रमोद नाईक हे मूळचे मध्य प्रदेशातील असून ते इलेक्ट्रीकल इंजिनीअर आहेत.

टाटा पॉवरमध्ये त्यांनी १९७५ ते २०१० या कालावधीत काम केले, तेथे वरिष्ठ अभियंता म्हणून ते निवृत्त झाले. कोलू ओढण्याच्या त्यांच्या या प्रयोगाच्यावेळी स्मारकात येणाऱ्यांनी त्यांच्याशी चर्चा केली, त्यांचे अनुभवही ऐकले. आपण सावरकर स्मारकात विविध कार्यक्रम पाहाण्यासाठी येत असतो, तेव्हा स्मारकात असलेला हा कोलू एकदा फिरवून पाहायचा होता. त्यावेळी हा प्रयोग करून तात्याराव सावरकरांना आलेला अनुभव आपणही घेऊ शकतो का, ते पाहावे यासाठी हा प्रयत्न होता, असेही त्यांनी सांगितले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा