यंदाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावर उपस्थित राहणाऱ्या विशेष पाहुण्यांना केंद्र सरकारने आकर्षक आणि पर्यावरणपूरक भेटवस्तू देण्याची योजना आखली होती आणि त्यानुसार सर्वांना त्याचे वाटप करण्यात आले. या किटचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे “नया भारत (नवा भारत)” या थीमवरील ज्यूट बॅग्स, ज्यामध्ये विविध उपयोगी वस्तू समाविष्ट आहेत.
भारतीय हस्तकलेने सजलेल्या पर्यावरणपूरक ज्यूट बॅग्समध्ये स्वातंत्र्यदिनाचं प्रतीक असलेले बुकलेट-माहितीपत्र, तिरंगा रंगाची टोपी, रेनकोट, पाण्याची बाटली, स्वच्छतेसाठी हँड सॅनिटायझर, वाइप्स, टिशू, ड्राय फ्रूट्स, बिस्किट्स असल्याची माहिती आहे. हे गिफ्ट पॅक विशेष अतिथी, शूर सैनिकांचे कुटुंबीय, पदाधिकारी, शालेय विद्यार्थी, आमंत्रित नागरिक यांना देण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे ५,००० विशेष पाहुण्यांना हे स्वागत किट दिलं गेलं. यात स्पेशल ऑलिंपिक्स संघ, आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि खेळो इंडिया पॅरा गेम्सचे सुवर्णपदक विजेते यांचा समावेश होता.
या उपक्रमामागील उद्दिष्ट:
-
“नवभारत” म्हणजे विकसित, आत्मनिर्भर भारताचा संदेश
-
पर्यावरणपूरक साहित्याचा वापर
-
पाहुण्यांचे सन्मानपूर्वक स्वागत
-
स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन
दरम्यान, पंतप्रधान मोदींनी यंदाच्या भाषणात राष्ट्राची सुरक्षा, आत्मनिर्भरतेची गरज, आर्थिक सुधारणा आणि दीर्घकालीन विकास या सर्व पैलूंवर ठळक भर दिला. कार्यक्रमापूर्वी, पंतप्रधानांनी देशाला ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आणि विकसित भारताच्या उभारणीसाठी सर्वांना आणखी कठोर परिश्रम करण्याचे आवाहन केले.
“सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. हा दिवस आपल्याला आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी आणि विकसित भारत निर्माण करण्यासाठी आणखी कठोर परिश्रम करत राहण्याची प्रेरणा देवो. जय हिंद,” असे एक्सवर ट्वीटकरत त्यांनी लिहिले.
हे ही वाचा :
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समर्पणाला केले वंदन
पंतप्रधान मोदींचे स्वातंत्र्यदिनाचे आतापर्यंतचे सर्वात मोठे भाषण, १०३ मिनिटं!
पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून पाकिस्तानला काय दिला संदेश?
मिशन सुदर्शन चक्र; पुढील १० वर्षात उभारणार भारताचे ‘आयरन डोम’







