29.5 C
Mumbai
Tuesday, May 20, 2025
घरविशेष७० हजारांचे हेल्मेट अन् १२ लाखांची स्पोर्ट्स बाईक, उद्योजकाच्या मुलाचा अपघाती मृत्यू;...

७० हजारांचे हेल्मेट अन् १२ लाखांची स्पोर्ट्स बाईक, उद्योजकाच्या मुलाचा अपघाती मृत्यू; काय घडलं नेमकं?

कोल्हापूरमधील दुर्दैवी घटना

Google News Follow

Related

कोल्हापूरमधील उद्योजक आणि बांधकाम व्यावसायिक विलास रेडेकर यांच्या मुलाच्या दुचाकीला झालेल्या अपघातात मुलाचा मृत्यू झाला. महागडी दुचाकी आणि अत्याधुनिक हेल्मेट डोक्यावर असतानाही गाडी आणि हेल्मेटचा अपघातादरम्यान चक्काचूर झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दुचाकीचा वेग या अपघातासाठी कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. सिद्धेश विलास रेडेकर (वय २३, रा. माळी कॉलनी, टाकळा, कोल्हापूर) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. सिद्धेश याच्या निधनाने परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.

आजरा आंबोली महामार्गावर देवर्डे मादाळ तिट्टा दरम्यान सिद्धेशच्या दुचाकीला अपघात झाला. सिद्धेशला दुचाकी चालवण्याची आणि फोटोग्राफीची आवड होती. त्यामुळे तो सतत मित्रांसोबत दुचाकीवरून फिरायला जात असे. नेहमीप्रमाणे सिद्धार्थ हा त्याच्या चार मित्रांसोबत रविवारी सकाळी आंबोलीकडे बाईक राईडसाठी गेला होता. माहितीनुसार, कोल्हापुरातून सकाळी ६ वाजता ते निघाले होते. आंबोली घाटातील विविध ठिकाणी त्यांनी भेटी देत आणि फोटो काढत वेळ घालवला. पुढे सकाळी ११ वाजता ते कोल्हापूरच्या दिशेने येत असतानाच एका धोकादायक वळणावर कोल्हापूरहून सावंतवाडीकडे जाणाऱ्या टवेरा गाडीची सिद्धेशच्या बाईकची समोरून धडक झाली.

अपघात इतका भीषण होता की, सिद्धेशच्या डोक्यावरील हेल्मेट रस्त्याच्या कडेला तुटून पडले. तर या धडकेमध्ये त्याच्या हाताला, छातीला, डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने गडहिंग्लजमध्ये खासगी दवाखान्यामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याची प्राणज्योत मालवली. सिद्धेशकडे तब्बल ७० हजारांचे अत्याधुनिक हेल्मेट होते. शिवाय त्याची दुचाकीही १२ लाख रुपयांची अत्याधुनिक अशी होती. मात्र तरीही या अत्याधुनिक दुचाकीचा आणि हेल्मेटचा अपघातानंतर चक्काचूर झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्याच्या हेल्मेटला कॅमेरा सुद्धा होता. त्यामुळे आता कॅमेरामधून काही माहिती समोर येते का याचा तपास सुरू आहे. दरम्यान, पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सिद्धेशच्या गाडीचा वेगच कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे.

हे ही वाचा : 

झारखंडमध्ये एक कोटींचे बक्षीस असलेल्या नक्षल नेत्यासह आठ नक्षलवाद्यांचा खात्मा

खलिस्तान्यांकडून तिसऱ्यांदा ब्रिटिश कोलंबिया येथील हिंदू मंदिराची तोडफोड

हुथी बंडखोरांवरील हल्ल्याच्या योजना अमेरिकेच्या संरक्षण सचिवांनी कुटुंबियांसोबत केल्या शेअर?

साई किशोरला एक ओव्हरच का?

सिद्धेश रेडेकर (वय २३) हा कोल्हापूरमध्ये आर्किटेक्चरचे शिक्षण घेत होता. बांधकाम व्यावसायिक विलास रेडेकर यांचा तो मुलगा असून त्यांचा कोल्हापूरमध्ये मोठा जनसंपर्क असल्याने मुलाच्या अपघाताचे वृत्त समजताच परिसरात मोठी गर्दी झाली होती. सिद्धेश हा एकुलता एक होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
249,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा