बिहारची राजधानी पाटणा येथील जयप्रकाश नारायण आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक मोठा विमान अपघात टळला आहे. वैमानिकाच्या सतर्कतेमुळे विमानात बसलेल्या १७३ प्रवाशांचे प्राण वाचले. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीहून पाटणा येथे येणारे इंडिगो विमान धावपट्टीला स्पर्श करून लँडिंगसाठी निश्चित केलेल्या टच पॉइंटच्या थोडे पुढे गेले. यामुळे मोठी दुर्घटना घडू शकली असती पण वैमानिकाने शहाणपण दाखवत लोकांचे प्राण वाचवले.







