31 C
Mumbai
Friday, March 6, 2026
घरविशेषअसेही देशप्रेम, पाठीवर तब्बल ५५९ सैनिकांची नावे, ११ महान व्यक्तींच्या प्रतिमा गोंदवल्या!

असेही देशप्रेम, पाठीवर तब्बल ५५९ सैनिकांची नावे, ११ महान व्यक्तींच्या प्रतिमा गोंदवल्या!

यूपीच्या अभिषेक गौतमची देशभर चर्चा, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्येही नोंद

Google News Follow

Related

शरीरावर एखादे चित्र, चित्रपट अभिनेता-अभिनेत्री किंवा एखाद्या प्रिय व्यक्तीचे नाव गोंदवल्याचे आतापर्यंत अनेकांनी पाहिले असेल. मात्र, देशाचे रक्षण करणारे शूर सैनिक आणि देशासाठी बलिदान दिलेल्या महान व्यक्तींची प्रतिमा गोंदवल्याचे आतापर्यंत तरी कोणी समोर आले नाही. याच दरम्यान, उत्तर प्रदेशच्या हापूर येथील अभिषेक गौतम या तरुणाची जिल्ह्यासह देशभरात चर्चा होत आहे. याचे कारण म्हणजे त्याने आपल्या पाठीवर गोंदवलेली नावे आणि चित्रे आहेत. तरुणाने तब्बल ५५९ सैनिकांची नावे आणि ११ महान व्यक्तींच्या प्रतिमा आपल्या शरीरावर गोंदवून घेतल्या आहेत. याचा व्हिडीओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

अभिषेक गौतम याने देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या ५५९ जवानांची नावे आपल्या शरीरावर गोंदवून घेतली आहेत. त्याच्या शरीरावर भगतसिंह, महात्मा गांधी, राणी लक्ष्मीबाई, छत्रपती शिवाजी महाराज आणि इंडिया गेट यांच्याही प्रतिमा गोंदवण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, अभिषेक गौतम यांना या कामगिरीबद्दल इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये स्थान मिळाले आहे.

यावर एएनआयशी संवाद साधताना ते म्हणाले, “माझ्या शरीरावर कोरलेली नावे त्या ५५९ शूर जवानांची आहेत, ज्यांनी कारगिल युद्धात आपल्या देशाचे रक्षण करताना आपले प्राण अर्पण केले… माझ्या शरीरावर ११ महान व्यक्तींच्या प्रतिमा आहेत, ज्यांच्या कथा आपण लहानपणापासून पुस्तकांमध्ये वाचत आलो आहोत.

हे ही वाचा : 

मागील ११ वर्षांत राहुल गांधी निरुपयोगी झालेत, आता कामाच्या शोधात आहेत!

पुढील महिन्यात पंतप्रधान मोदी ट्रम्प यांना भेटण्याची शक्यता!

डीआरडीओचा गेस्ट हाऊस मॅनेजर निघाला पाकिस्तानी गुप्तहेर!

…ही तर लवंगी फटाक्यांची माळ !

यामध्ये चंद्रशेखर आझाद, भगत सिंग, सुभाषचंद्र बोस, गुरु गोविंद सिंग, राणी लक्ष्मीबाई, छत्रपती शिवाजी महाराज, चाणक्य आणि महात्मा गांधी यांचा समावेश आहे. मी इंडिया गेट आणि शहीद स्मारक यांच्याही प्रतिमा शरीरावर गोंदवून घेतल्या आहेत. मी माझ्या सर्व देशबांधवांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो… आणि एवढंच नाही तर १५ ऑगस्ट नंतरही प्रत्येकाच्या मनात देशप्रेमाची हीच भावना टिकून राहावी, हीच माझी इच्छा आहे…”, असे अभिषेक गौतम याने म्हटले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
297,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा