पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज ७५ वा वाढदिवस असून देशभरातील आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील नेते, सेलिब्रिटी आणि सामान्य लोकांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. वाढदिवसानिमित्त पक्षाकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक नेते, सिलीब्रीटिंनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देत पंतप्रधान मोदींसोबतच्या त्यांच्या भेटीची कहाणी शेअर केल्या आहेत. अभिनेते आर. माधवन यातीलच एक आहेत. अभिनेता माधवन यांनी त्यांच्या ‘Rocketry: The Nambi Effect’ चित्रपटाच्या तयारी दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल एक संस्मरणीय अनुभव शेअर केला आहे.
“उरी चित्रपट प्रदर्शित आणि यशस्वी झाल्यानंतर पंतप्रधान मोदी मुंबईत एका कार्यक्रमासाठी आले होते जिथे चित्रपट क्षेत्रातील अनेक कलाकार उपस्थित होते. सर्वजण त्यांना भेटण्यासाठी आणि फोटो घेण्यासाठी उत्सुक होते. मीही तिथे होतो, पण माझा अवतार वेगळा होता. चित्रपटात मी नंबी नारायणजींच्या भूमिका साकारत असल्याने मोठी दाढी, पूर्ण मेकअपसह त्याठिकाणी उपस्थित होतो.
माझ्या वेशभूषेमुळे मला वाटतं होतं कि पंतप्रधान मोदी मला ओळखतील की नाही. पण ज्या क्षणी त्यांनी मला पाहिले, ते म्हणाले, माधवन जी, तुम्ही नंबी नारायणसारखे दिसता. चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाले आहे का?”, हे ऐकताच मी स्तब्ध झालो. देश-दुनियाभराच्या जबाबदाऱ्यांनी ओतप्रोत असणाऱ्या पंतप्रधान मोदींनी इतक्या बदललेल्या स्वरूपातही मला त्वरित ओळखले आणि काय काम चालू आहे तेही आठवले, याचे मला आश्चर्य वाटले, असे माधवन यांनी म्हटले.
हे ही वाचा :
सीबीआय न्यायालयाकडून कस्टम निरीक्षकासह दोघांना पाच वर्षांची शिक्षा
बॉम्बे हायकोर्टने ‘जॉली एलएलबी ३’ विरोधातील याचिका फेटाळली
मुरादाबादमध्ये पोलिस–पशुतस्करांमध्ये चकमक
नवा भारत अण्वस्त्रांच्या धमक्यांना घाबरत नाही!
ते पुढे म्हणाले, त्या दिवसाची एक विशेष आठवण म्हणजे, त्या दिवशी मी पहिल्यांदाच मोदीजींसोबत सेल्फी देखील घेतली आणि त्या वेळी दोघांच्या देखील दाढ्या सारख्या होत्या. हा क्षण माझ्यासाठी खूप प्रिय आहे, कारण यातून मला समजले की मोदीजी फक्त दूरदृष्टीचे नेते नाहीत, तर माणूस आहेत जे लोकांना वैयक्तिक पातळीवर पाहतात, लक्षात ठेवतात आणि त्यांचे कौतुक करतात.
#MYMODISTORY
When I was preparing for my movie Rocketry, I got a personal experience of Modi ji’s extraordinary attentiveness. This was right after Uri had released and become a huge success. Modi ji was visiting Mumbai for an event at the, where a lot of people from the film… pic.twitter.com/aubALNq7Gx— Ranganathan Madhavan (@ActorMadhavan) September 17, 2025
वरील अनुभव शेअर करताना माधवन यांनी पंतप्रधान मोदी यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त त्यांनी दिलेल्या शुभेच्छाही व्यक्त केल्या, “तुमच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त, तुम्हाला आतापर्यंतचा सर्वात आनंदी वाढदिवस होवो आणि पुढचे वर्ष निरोगी आणि आनंदी जावो,” असे माधवन यांनी आशिर्वाद स्वरूपाचे सुविचार व्यक्त केले आहेत.







