28.2 C
Mumbai
Monday, October 19, 2026
घरविशेष'कॉक्रोच'ना ताब्यात घेतल्यावर प्रवासी म्हणाले, स्वच्छ भारत अभियान

‘कॉक्रोच’ना ताब्यात घेतल्यावर प्रवासी म्हणाले, स्वच्छ भारत अभियान

प्रवाशांच्या संतापाचा व्हिडीओ व्हायरल

Google News Follow

दिल्ली पोलिसांनी विमानात प्रवेश करून ‘कॉकरोच जनता पार्टी’चे (सीजेपी) संस्थापक अभिजीत दीपके आणि त्याच्या सहकाऱ्यांना ताब्यात घेतले. या कारवाईदरम्यान झालेल्या विलंबामुळे विमानातील इतर प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे प्रवाशांनी संबंधितांबद्दल नाराजी व्यक्त केल्याचे व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अभिजीत दीपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांना पोलिसांनी विमानातूनच ताब्यात घेतले. या कारवाईमुळे विमानातील वातावरणही काही काळ तणावपूर्ण झाले होते.

जंतर-मंतर येथे नियोजित आंदोलनासाठी अभिजीत दीपके, आशुतोष रांका आणि सौरव दास मुंबईहून दिल्लीला आले होते. शनिवारी सकाळी त्यांचे विमान दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी थेट विमानात प्रवेश करत तिघांनाही ताब्यात घेतले. या कारवाईमुळे विमानातील इतर प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला.

पोलिस आणि दीपके यांच्यात काही काळ संभाषण सुरू होते. या दरम्यान विमानातील इतर प्रवाशांनाही प्रतीक्षा करावी लागली. तिघांना ताब्यात घेऊन बाहेर नेईपर्यंत प्रवाशांना थांबवून ठेवल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी काही प्रवाशांनी ‘शेम ऑन यू’, ‘कचरा साफ’, ‘देशद्रोही’ आणि ‘स्वच्छ भारत अभियान’ अशा घोषणा देत त्यांच्याविरोधात रोष व्यक्त केला. चुकीचे वर्तन करून इतरांना विनाकारण वाट पाहायला लावू नका, अशा शब्दांतही प्रवाशांनी आपली नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, तिघांना खाली उतरण्यास सांगणाऱ्या एका महिलेच्या दिशेने सौरव दासने ‘शेम ऑन यू’ म्हटले. त्यावर त्या महिलेनेही त्याच शब्दांत, ‘शेम ऑन यू’, असे प्रत्युत्तर दिल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्यानंतर पोलिस या तिघांना घेऊन जात असताना विमानातील इतर प्रवाशांनी ‘देशद्रोही’ आणि ‘स्वच्छ भारत अभियान’ अशा घोषणा देत आपला संताप व्यक्त केला.

हे ही वाचा:

सौर वादळाचा पृथ्वीला तडाखा! भारतावर काय परिणाम?

कॉकरोचच्या आंदोलनापूर्वी ५० गुन्हेगारांसह ५०० जण ताब्यात

स्टारलिंकला परवानगी नाही, मस्क यांची अंबानींवर आगपाखड

दीपके, रांका, सौरव दासला पोलिसांनी विमानातच घेतले ताब्यात

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सीजेपीने आंदोलनाची घोषणा केली होती. मात्र, आंदोलनापूर्वीच पोलिसांनी कारवाई सुरू केली. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये सुरक्षा व्यवस्था मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. जंतरमंतर परिसरासह राजधानीतील प्रमुख प्रवेशमार्गांवर पोलीस आणि निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. मेट्रो स्थानकांवरील निर्बंध, रेल्वेगाड्या रद्द करणे आणि काही भागांत मोबाइल इंटरनेट सेवा स्थगित करण्यासारख्या उपाययोजनाही करण्यात आल्या आहेत.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा