30 C
Mumbai
Sunday, January 25, 2026
घरविशेषअहमदाबाद विमान अपघात : १४४ जणांचे डीएनए नमुने जुळले

अहमदाबाद विमान अपघात : १४४ जणांचे डीएनए नमुने जुळले

Google News Follow

Related

एअर इंडियाच्या विमान अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशांच्या डीएनए नमुन्यांची पडताळणीची प्रक्रिया सुरू आहे. गुजरातचे गृह मंत्री हर्ष सांघवी यांनी मंगळवारी या संदर्भात माहिती दिली असून आतापर्यंत १४४ मृतदेहांची ओळख पटली आहे, असे त्यांनी सांगितले. हर्ष सांघवी यांनी मंगळवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर लिहिले की, “दुपारी १२ वाजेपर्यंत १४४ डीएनए नमुन्यांचे जुळवणी यशस्वीरीत्या झाली आहे.

सोमवारी अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ. राकेश जोशी यांनी सांगितले होते की, अपघातात मृत्यू झालेल्या ६४ जणांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना देण्यात आले आहेत. तसेच, २४ कुटुंबांनी आम्हाला माहिती दिली आहे की ते लवकरच मृतदेह स्वीकारतील. त्याआधी गृह मंत्री हर्ष सांघवी यांनी अपघातस्थळी मिळालेल्या वस्तूंविषयीही माहिती दिली होती. ते म्हणाले होते की, सर्व वस्तू एकत्र करून, नोंदवून संबंधित कुटुंबियांकडे सुपूर्द केल्या जातील.

हेही वाचा..

कोझिकोड सेक्स रॅकेट प्रकरण : केरळचे दोन पोलीस अटकेत

जातनिहाय जनगणा : काँग्रेसचा खोटारडेपणा उघड

१८ जूनलाच कालाष्टमी साजरी होणार, जाणून घ्या का ?

जी-७ शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदी कॅनडात

त्यांनी रविवारी एक्स वर लिहिले होते, “अपघातस्थळी मिळालेल्या प्रत्येक वस्तूची काळजीपूर्वक नोंद घेतली जाईल आणि ती संबंधित कुटुंबियांना सन्मानपूर्वक सुपूर्द केली जाईल. आमची टीम या वस्तू ओळखण्यासाठी आणि योग्य कुटुंबांपर्यंत पोहोचवण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे. आम्ही नागरी उड्डाण विभागासोबत समन्वय साधून हे सर्व सुसंगत व सन्मानजनक पद्धतीने पार पाडत आहोत.

१२ जून रोजी अहमदाबादहून लंडनला जाणारी एअर इंडिया फ्लाइट दुर्घटनाग्रस्त झाली होती. विमानात १२ क्रू मेंबर्ससह २३० प्रवासी होते. या भीषण अपघातात फक्त एक प्रवाशी वाचला आहे, जो भारतीय वंशाचा ब्रिटिश नागरिक आहे. २४१ जणांचा या अपघातात मृत्यू झाला. या मृतांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचाही समावेश होता. विमानात आग लागल्यामुळे अनेक मृतदेह पूर्णतः जळाले होते, त्यामुळे ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी अनिवार्य झाली होती.

या अपघाताच्या चौकशीसाठी आवश्यक असलेले दोन्ही ‘ब्लॅक बॉक्स’ मिळाले आहेत. कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (CVR) – जो दुसरा ब्लॅक बॉक्स म्हणून ओळखला जातो – तो मलब्याच्या कॉकपिट भागातून बाहेर काढण्यात आला आहे. फ्लाइट डेटा रेकॉर्डर (FDR) याआधीच सापडले होते. या घडामोडीनंतर चौकशी अधिक तीव्र करण्यात आली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा