27 C
Mumbai
Friday, January 23, 2026
घरविशेषअहमदाबाद विमान अपघात : आतापर्यंत ८७ जणांचे डीएनए नमुने जुळले

अहमदाबाद विमान अपघात : आतापर्यंत ८७ जणांचे डीएनए नमुने जुळले

Google News Follow

Related

अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातानंतर सिव्हिल रुग्णालयात आपल्या कुटुंबातील सदस्यांची किंवा नातेवाईकांची ओळख पटवण्यासाठी लोकांच्या रांगा लागलेल्या आहेत. गेल्या दोन दिवसांपासून रुग्णालयाने मृतदेहांची ओळख पटवण्याची प्रक्रिया वेगाने सुरू केली आहे. आतापर्यंत सुमारे ९० जणांची ओळख डीएनए नमुन्यांच्या आधारे पटवण्यात आली आहे. ही माहिती अहमदाबाद सिव्हिल रुग्णालयाचे अ‍ॅडिशनल सिव्हिल सुपरिटेंडेंट डॉ. रजनीश पटेल यांनी दिली.

विमान अपघातानंतर मृतदेहांची अवस्था अत्यंत खराब झाल्यामुळे ओळख पटवणं कठीण झालं होतं, त्यामुळे डीएनए चाचणी आवश्यक ठरली. डॉ. रजनीश पटेल यांनी सोमवारी सांगितले की, रुग्णालयात आलेल्या मृतदेहांपैकी ९२ मृतदेहांचे डीएनए नमुने जुळवण्यात आले. यामध्ये काही नमुने समान असल्याने वगळण्यात आले आणि शेवटी ८७ डीएनए जुळवण्यात आले. यामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचा समावेश आहे, ज्यांची ओळख रविवारी डीएनए नमुन्याच्या माध्यमातून झाली.

हेही वाचा..

…तर पाकिस्तान इजरायलवर करेल अणुबॉम्बहल्ला

रूपाणी यांच्या निधनानंतर राज्यात दुखवटा

भारतातील गरिबांच्या जीवनमानात आमूलाग्र बदल का घडला?

केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेनंतर पायलट्सचे परवाने निलंबित

डॉक्टरांनी सांगितले की, आतापर्यंत ४७ मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले आहेत. अजूनही १३ कुटुंबं अशा अवस्थेत आहेत जे आपल्या प्रियजनांच्या अंतिम दर्शनाची आणि मृतदेहाच्या सुपुर्दकीची प्रतीक्षा करत आहेत. डॉ. रजनीश पटेल यांच्या माहितीनुसार, आत्तापर्यंत गुजरातमधील अहमदाबाद, खेड़ा, बोटाद, मेहसाणा, भरूच, अरावली, आणंद, जूनागढ, महीसागर आणि गांधीनगर येथील कुटुंबीयांना त्यांच्या सदस्यांचे मृतदेह सुपूर्त करण्यात आले आहेत.

ते म्हणाले की, नातेवाईकांकडून ओळख पटवण्याच्या प्रक्रियेत १२ कुटुंबीय सहभागी आहेत. आपल्या नातेवाईकांचा मृतदेह ओळखण्यासाठी ११ लोक सध्या रुग्णालयात उपस्थित आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, प्रशासन पीडित कुटुंबांशी सातत्यानं संपर्कात आहे आणि त्यांना शक्य त्या सर्व प्रकारची मदत दिली जात आहे. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, डीएनए जुळवण्याची प्रक्रिया अत्यंत काळजीपूर्वक आणि वैज्ञानिक पद्धतीने केली जात आहे, जेणेकरून कोणतीही चूक होऊ नये.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा