26 C
Mumbai
Monday, February 23, 2026
घरविशेषकाँग्रेसच्या उघडेबाबांना पब्लिकचा प्रसाद!

काँग्रेसच्या उघडेबाबांना पब्लिकचा प्रसाद!

Google News Follow

Related

दिल्लीतील ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट’दरम्यान भारत मंडपम येथे घडलेल्या धक्कादायक प्रकाराने मोठी खळबळ उडाली आहे. समिट सुरू असतानाच युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शर्ट काढून घोषणाबाजी करत आंदोलन केले. मात्र या प्रकारामुळे संतप्त झालेल्या काही उपस्थितांनीच त्यांचा पाठलाग करून त्यांना कार्यक्रमस्थळाबाहेर हाकलल्याचे व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे. या घटनेनंतर दिल्ली पोलिसांनी कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे.

एआय इम्पॅक्ट समिटदरम्यान झालेल्या या प्रकारामुळे राजकीय वातावरण तापले आहे. यूथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना वाटले होते की त्यांच्या आंदोलनाला मोठा जनसमर्थन मिळेल आणि सरकारवर दबाव निर्माण होईल; मात्र प्रत्यक्षात परिस्थिती उलटीच झाली. सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात या कृतीवर तीव्र टीका होत असून अनेकांनी याला प्रसिद्धी मिळवण्याचा अयशस्वी प्रयत्न असे म्हटले आहे. अपेक्षित सहानुभूतीऐवजी काँग्रेसला विरोध आणि अपमानालाच सामोरे जावे लागल्याची चर्चा रंगली आहे.

शुक्रवारी आयोजित या उच्चस्तरीय आंतरराष्ट्रीय समिटला देश-विदेशातील मान्यवर, उद्योगक्षेत्रातील प्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान अचानक काही युवक काँग्रेस कार्यकर्ते पुढे येत टी-शर्ट काढून “पीएम इज कॉम्प्रोमाइज” अशा घोषणा देऊ लागले. काही काळ कार्यक्रमस्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले.

व्हायरल व्हिडिओमध्ये समिटला उपस्थित असलेले काही नागरिक आणि प्रतिनिधी या प्रकारामुळे संतप्त झाल्याचे दिसत असून, त्यांनी घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना मागे लागून बाहेर जाण्यास भाग पाडले. त्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी तातडीने हस्तक्षेप करत संबंधितांना ताब्यात घेतले आणि परिसरातून दूर नेले.

दरम्यान, अतिरिक्त पोलीस उपायुक्त आनंद मिश्रा यांनी सांगितले की संबंधित कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. प्रशासनाकडून समिट सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

या घटनेमुळे राजकीय वातावरण तापले असून, एकीकडे भाजपकडून तीव्र टीका केली जात आहे, तर काँग्रेसकडून आंदोलनाचे समर्थन करण्यात येत आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
295,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा