ऑस्ट्रेलियातील शास्त्रज्ञ असे एक कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) साधन विकसित करत आहेत, जे रेटिना (डोळ्याच्या पडद्याची) प्रतिमा विश्लेषित करून हृदय व मूत्रपिंडाशी संबंधित दीर्घकालीन आजारांचे अधिक अचूक निदान करू शकेल. मोनाश विद्यापीठाच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या संशोधन प्रकल्पाचा उद्देश असा एक “फाउंडेशनल एआय मॉडेल” तयार करणे आहे, जे रेटिनाच्या प्रतिमांद्वारे शरीरातील विविध प्रणालींवर परिणाम करणाऱ्या (सिस्टेमिक) आजारांची ओळख करून देऊ शकेल.
सिन्हुआ वृत्तसंस्थेने विद्यापीठाच्या निवेदनाचा हवाला देत सांगितले की, संशोधन पथक प्रगत एआय तंत्रज्ञानाच्या साहाय्याने हजारो लोकांच्या आरोग्याशी संबंधित रेटिना प्रतिमांचे विश्लेषण करणार आहे. यामुळे नॉन-इनवेसिव्ह (शरीरात छेड न करता तपासता येणारी) आणि अधिक अचूक स्क्रीनिंग साधने विकसित करता येतील, ज्यामुळे रोगांचे लवकर निदान, उपचार आणि प्रतिबंध शक्य होईल. सध्या उपलब्ध साधनांमध्ये पर्याय कमी आहेत आणि त्यांची किंमत जास्त असल्याने त्यांचा व्यापक वापर कठीण ठरतो.
हेही वाचा..
टेक्नॉलॉजीबरोबरच प्रत्यक्ष ग्राहक संपर्कावरही भर द्या
तख्तापालट नको गं बाई… तुलसी गबार्डवर विश्वास ठेवता येईल का?
बेकायदेशीर बेटिंग प्लॅटफॉर्म प्रकरणी धवन, रैना यांच्याशी संबंधित मालमत्तेवर जप्ती
नेपाळनंतर आता पाकमधील Gen Z सरकारविरोधात रस्त्यावर! काय आहे प्रकरण?
मोनाश विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापक झोंगयुआन गे यांच्या मते, हा प्रकल्प अनेक वर्षांपासून संकलित केलेल्या डी-आयडेंटिफाइड (गोपनीय ठेवलेल्या) डेटावर आधारित आहे. या डेटावरून एक मल्टीमॉडल एआय मॉडेल विकसित केले जात आहे — म्हणजेच, असे मशीन लर्निंग मॉडेल जे एकाच वेळी विविध प्रकारचा डेटा प्रक्रिया करून त्याचे विश्लेषण करू शकते. हे मॉडेल एकाच वेळी अनेक आजारांची ओळख करू शकेल, जे आतापर्यंतच्या “सिंगल-डिजीज” (एका आजारावर केंद्रित) पद्धतींपेक्षा खूपच व्यापक असेल. ऑप्टेन हेल्थचे अध्यक्ष झॅकरी टॅन, जे या अभ्यासाचे सह-नेतृत्व करीत आहेत, यांनी सांगितले की, रेटिनल इमेजिंगच्या माध्यमातून आजारांचे लक्षणे सुरुवातीच्या टप्प्यातच ओळखणे शक्य होईल, आणि त्यामुळे आपली आरोग्यव्यवस्था “उपचारकेंद्रित” न राहता “प्रतिबंधकेंद्रित” होईल.







