इंडोनेशियातील रिसॉर्ट बेट बाली येथे माउंट लेवोटोबी लाकी-लाकी ज्वालामुखीच्या स्फोटामुळे बुधवारी अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली. या पार्श्वभूमीवर, दिल्लीहून बालीकडे जाणारी एअर इंडियाची फ्लाइट AI2145 प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून दिल्लीला परत आणण्यात आली. हा स्फोट फ्लोरेसच्या पूर्वेकडील बेटावर झाला. १,५८४ मीटर उंच असलेल्या या ज्वालामुखीच्या वाढत्या सक्रियतेमुळे इंडोनेशियाच्या चार-स्तरीय अलर्ट प्रणालीमध्ये याचे सर्वोच्च इशारा स्तर लागू करण्यात आले. एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी सांगितले, “AI2145 फ्लाइट सुरक्षितपणे दिल्लीला परतली असून सर्व प्रवासी सुखरूपपणे खाली उतरले आहेत.
ते पुढे म्हणाले, “प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही खेद व्यक्त करतो. प्रभावित प्रवाशांसाठी हॉटेलमध्ये राहण्याची सुविधा देण्यात आली असून त्यांना होणाऱ्या त्रासाची भरपाई करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले गेले आहेत. प्रवाशांनी इच्छा दर्शवल्यास त्यांना पूर्ण परतावा देण्याची तसेच फ्लाइट कॅन्सलेशन किंवा कॉम्प्लिमेंटरी रि-शेड्युलिंगची सुविधा दिली जात आहे. बाली विमानतळाचे ऑपरेटर ‘अंगकासा पुरा इंडोनेशिया’ यांच्या माहितीनुसार, पूर्व नुसा तेंगारा भागात झालेल्या ज्वालामुखीच्या स्फोटामुळे गुस्ती नगुराह राय आंतरराष्ट्रीय विमानतळावर अनेक फ्लाइट्स रद्द करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा..
पंतप्रधान मोदी आणि मार्क कार्नी यांची काय चर्चा झाली ?
पती कर्ज फेडण्यात अयशस्वी, सावकाराने पत्नीला झाडाला बांधत केली मारहाण!
आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवादी नेत्याच्या ३ नातेवाईकांची नक्षलवाद्यांकडून हत्या!
अमेरिकेला खामेनी कुठे लपलेत माहिती आहे, पण आत्ताच मारणार नाही!
एअरएशियाने चालवलेल्या अनेक देशांतर्गत उड्डाणांवरही याचा परिणाम झाला आहे. जेटस्टारनेही बालीच्या दिशेने होणाऱ्या उड्डाणे रद्द केल्याचे जाहीर केले आहे. मात्र, राख हटण्याची शक्यता लक्षात घेता, काही दुपारच्या फ्लाइट्स संध्याकाळपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. बाली आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या वेब पोर्टलवर, एअर न्यूजीलंड, सिंगापूरची टायगरएअर, आणि चीनची जुनेयाओ एअरलाइन्स यांच्याही फ्लाइट्स रद्द झाल्याचे दाखवले आहे.
इंडोनेशिया आपत्ती व्यवस्थापन एजन्सीच्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री उशिरा ज्वालामुखीच्या परिसरातील गावांवर राख पडण्यास सुरुवात झाली होती, ज्यामुळे एक वस्ती रिकामी करण्यात आली. अंदाजानुसार, ज्वालामुखीच्या राखेचा प्रभाव आज रात्रीपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. ‘लेवोटोबी’ हा इंडोनेशियाच्या फ्लोरेस बेटाच्या दक्षिणपूर्व भागात असलेला दुहेरी ज्वालामुखी आहे. यात दोन प्रमुख टोकं आहेत – लेवोटोबी लाकी-लाकी आणि लेवोटोबी पेरेम्पुआन स्ट्रॅटोव्होल्कॅनो. यामधील अधिक सक्रिय असलेला लेवोटोबी लाकी-लाकी, उंच असलेल्या लेवोटोबी पेरेम्पुआनपासून सुमारे २.१ किलोमीटर उत्तर-पश्चिमेकडे आहे.







