एअर इंडियाचे विमान अहमदाबाद येथे कोसळल्यानंतर आता बोईंग ड्रीमलायनर विमानाच्या एकूणच सुरक्षिततेच्या बाबतीत सर्वंकष तपासण्या करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरी हवाई उड्डयन मंत्रालयाने जाहीर केले आहे की, रविवार, १५ जूनपासून एअर इंडियाच्या बोईंग ७८७–८/९ विमानपरिवारातील सर्व विमानांची सखोल सुरक्षितता तपासणी केली जाईल. ही कारवाई ड्रीमलाईनर आणि अमेरिकन विमानन कंपनी बोईंग यांच्यावर खोलवर चौकशी सुरू झाल्यानंतर करण्यात आली आहे. अहमदाबादमध्ये कोसळलेल्या एअर इंडियाच्या विमानातील एक व्यक्ती सोडता बाकी कुणालाही वाचविण्यात यश न आल्याने ही पावले उचलण्यात आली आहेत.
डिरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन (DGCA) कडून हे आदेश देण्यात आल्यामुळे, खालील प्रणालींचा तपशीलवार पााठपुरावा करणे आवश्यक आहे आणि याचा अहवाल तपासणीसाठी सादर करावा लागेल:
-
इंधन संबंधित पॅरामीटर्सचे मॉनिटरिंग आणि संबंधित प्रणालींचे परीक्षण
-
केबिनमधील हवेचा कॉम्प्रेसर आणि संबंधित प्रणालींचे परीक्षण
-
इलेक्ट्रॉनिक इंजिन नियंत्रण प्रणालीचा चाचणी
-
इंजिन मार्फत चालणारी ऍक्च्युएटर ऑपरेशनल टेस्ट आणि तेल प्रणालीची पडताळणी
-
हायड्रॉलिक प्रणालीची सेवा-क्षमतेची तपासणी
-
टेक-ऑफ पॅरामीटर्सचे पुनरावलोकन
हे ही वाचा:
इस्रायलची मुत्सदी, जगभरातले दूतावास करणार बंद!
पोलीस उपयुक्ताच्या हत्येचा प्रयत्न, रिक्षा चालकाला अटक
कीवीची कमाल! आरोग्याची खास काळजी घेणारा फळ
भारताच्या फिजिक क्वीनची प्रेरणादायी कहाणी
याशिवाय, पुढील दोन आठवड्यांत ‘पॉवर ऍश्युरन्स तपासणी’ आणि ‘विमान नियंत्रण निरीक्षण’ सुरू करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. मागील १५ दिवसांत बोईंग ड्रीमलाईनर फ्लाइट्सवर आढळलेल्या वारंवार होणाऱ्या बिघाडांचे पुनरावलोकन सर्वात लवकर करण्यात यावे. तपासणीनंतर आवश्यक देखभाल करण्याचा आदेश सरकारने दिला आहे.
अहमदाबादमध्ये, सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाणानंतर एअर इंडियाच्या फ्लाइटने एक रहिवासी डॉक्टरांच्या होस्टेलमध्ये धडक दिली होती; या अपघातात किमान २६५ लोक ठार झाले.
हा अपघात २०११ मध्ये ७८७ ड्रीमलाईनरचे व्यावसायिक पदार्पण झाल्यापासून पहिला मोठा आणि जीवघेणा अपघात होता. २०२४ साली एका बोईंग अभियंत्याने ड्रीमलाईनरबाबत चिंता व्यक्त केली होती, परंतु या तक्रारी आणि अलीकडील एअर इंडिया अपघात यांच्यात कोणताही संबंध आढळलेला नाही.
या घटनेवर प्रतिक्रिया देत बोईंग एअरप्लेन कंपन्यानी सांगितले की, ते फ्लाइट १७१ संदर्भातील तपासात एअर इंडियाशी संपर्कात आहेत आणि “त्यांना समर्थन देण्यासाठी तयार” असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.







