28 C
Mumbai
Monday, February 23, 2026
घरविशेष“जनतेशी घट्ट नाते असलेले, तळागाळाशी मजबूत नाळ असलेले लोकनेते अजित पवार”

“जनतेशी घट्ट नाते असलेले, तळागाळाशी मजबूत नाळ असलेले लोकनेते अजित पवार”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या भावना

Google News Follow

Related

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राजकारणातील ‘दादा’ माणूस अशी ओळख असलेले व्यक्तिमत्व अजित पवार यांचे विमान अपघतात निधन झाले. मुंबईहून बारामतीला दौऱ्यासाठी जात असताना विमानाचे लँडिंग होताना अपघात झाला. अजित पवार यांच्यासह सहा जणांचा यात मृत्यू झाला. या वृत्तानंतर राज्यभरात शोककळा पसरली आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अजित पवारांच्या निधनाचा शोक व्यक्त केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, “अजित पवार हे जनतेशी घट्ट नाते असलेले, तळागाळाशी मजबूत नाळ असलेले लोकनेते होते. महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेत सदैव अग्रभागी राहणारे एक मेहनती व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांना व्यापक आदर होता. प्रशासकीय बाबींची त्यांना सखोल जाण होती. गरीब आणि वंचितांच्या सक्षमीकरणासाठीची त्यांची तळमळ विशेष उल्लेखनीय होती. त्यांचे अकाली निधन खूप धक्कादायक आणि दुःखद आहे. त्यांच्या कुटुंबीयांप्रती आणि असंख्य चाहत्यांप्रती मनःपूर्वक शोकसंवेदना. ॐ शांती,” असे पंतप्रधान मोदींनी ट्विट केले आहे.

राज्यामध्ये सध्या पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरू आहे. अजित पवार यांचा आज यासाठी बारामती दौरा होता. बारामती दौऱ्यासाठी आज सकाळी त्यांनी प्रस्थान केलं होतं. बारामतीमध्ये विमान लाँडिंग होत असतानाच विमानाला अपघात झाला. विमानामध्ये अजित पवार यांच्यासह पाच जण होते. त्या सर्वांचा या अपघातात मृत्यू झाला.

हे ही वाचा:

चांदीला चढा भाव! २१,००० रुपयांची उसळी

बारामतीमध्ये विमान अपघातात अजित पवारांचा मृत्यू

बारामतीत लँडिंग दरम्यान विमानाला अपघात; अजित पवार गंभीर जखमी

वडाळ्यात उभारली १५ फुटी तलवार; बिलाली फाउंडेशनचा उद्योग

अजित पवार हे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी म्हणून बारामती येथे जात होते. त्यांच्या या भागात प्रचारसभा आयोजित करण्यात आल्या होत्या यासाठी ते विमानाने जात होते. बारामती विमानतळाजवळ विमान लँडिंग होत असतानाच विमानाचा अपघात झाला आणि ते विमान जवळच्या शेतात कोसळले. हा अपघात भीषण स्वरुपाचा होता. विमान कोसळल्यानंतर हवेत मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
295,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा