24 C
Mumbai
Tuesday, December 23, 2025
घरविशेषअखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने जपला सामाजिक दायित्वचा वारसा

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने जपला सामाजिक दायित्वचा वारसा

Google News Follow

Related

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ हा गरजू वृद्ध जोडप्याच्या मदतीला धावून आला आहे. श्री.विश्वनाथ सोमण आणि सौ.अपर्णा सोमण यांचा खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय कोविड महामारीत बंद पडला. तेव्हा ब्राह्मण महासंघातर्फे त्यांना आवश्यक ती मदत पुरवण्यात आली.

वृद्धापकाळामुळे आलेल्या व्याधी, पोटच्या पोराकडून पदरी पडलेली उपेक्षा अशा परिस्थिती स्वाभिमानी असलेले सोमण जोडपे खाद्यपदार्थांची विक्री करून आपला उदरनिर्वाह करत होते. अशातच आलेल्या कोविड संकटाने सोमण दांपत्यावर आभाळ कोसळले. अशात त्यांनी मदतीसाठी अखिल भारतीय ब्राह्मण संघाशी संपर्क साधला.

हे ही वाचा:

‘एमपीएससी’ त नापास झालेले ठाकरे सरकार

डाव्यांच्या ‘खेळाचा’ अजून एक भारतीय बळी

शर्जील उस्मानी हा ठाकरे सरकारचा जावई

महासंघाचे पदाधिकारी त्यांना भेटले, सत्यता पडताळून महासंघाच्या वतीने १५,००० रोख (पंधरा हजार) रक्कम, पुढील ६ महिने या कुटुंबाला पुरेल एवढे किराणा साहित्य, वैद्यकीय सेवा एक कर्तव्य म्हणुन देण्यात आली. त्या सोबतच त्यांचा खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय पुन्हा सुरु करण्यासाठी आवश्यक ती मदत ब्राह्मण महासंघातर्फे करण्यात येणार आहे.

या उपक्रमाला अध्यक्ष डॉ गोविंद जी कुलकर्णी, लक्ष्मीकांत धडफळे (राष्ट्रीय युवा अध्यक्ष), सौं केतकी कुलकर्णी (जिल्हाध्यक्षा महिला आघाडी),सुनील शिरगांवकर, सुयोग नाईक, गिरीश कुलकर्णी, प्रिया काळे (कॅनडा), पराग महाशब्दे ,सौं दीपिका बापट (सरचिटणीस), सौं स्वरस्वती जोशी, सौं शिल्पा महाजनी, मनीष जोशी, हेमंत कासखेडीकर, सुधाकर मोडक,मंदार रेडे यांनी आर्थिक मदत केली तसेच श्रीकांत देशपांडे, विकास अभ्यंकर यांनी किराणा साहित्य दिले.वारजे शाखेच्या उपाध्यक्षा सौं शैला सोमण यांनी सोमण परिवारातर्फे  त्यांना मदतीचे आश्वासन दिले, नाना काटे व जेष्ठ नागरिक संघातर्फे पुढील ३ महिने जेवण्याच्या डब्याची तयारी दर्शवली. यासाठी कार्याध्यक्ष मंदार रेडे यांनी पुढाकार घेतला होता.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
285,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा