28.2 C
Mumbai
Sunday, October 18, 2026
घरविशेषअभिनेता अक्षय कुमारला कोरोनाची लागण !

अभिनेता अक्षय कुमारला कोरोनाची लागण !

अनंत अंबानींच्या लग्न सोहळ्याला राहणार होता उपस्थित

Google News Follow

बॉलिवूड प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमारला कोरोनाची लागण झाली आहे. अक्षय कुमारची कोविड-१९ चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. विशेष म्हणजे अक्षय कुमार आज (१२ जुलै) अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या भव्य विवाह सोहळ्याला उपस्थित राहणार होता. मात्र, कोरोनाची लागण झाल्यामुळे अभिनेता लग्न सोहळ्याला उपस्थित राहू शकणार नाही.

इंडिया टुडेच्या बातमीनुसार, अक्षय कुमारची गेल्या दोन दिवसांपासून तब्बेत ठीक नव्हती. तो त्याच्या नुकत्याच रिलीज झालेल्या ‘सरफिरा’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी व्यस्त होता. चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यानच अभिनेत्याला कोरोनाची लागण झाली होती. तब्बेत ठीक नसल्यामुळे अक्षयने कोरोनाची चाचणी केली असता त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर अक्षय कुमारने स्वतःला क्वारंटाईन करून घेतलं असून डॉक्टरांनी सांगितलेल्या गोष्टींची खबरदारी घेत आहे.

हे ही वाचा:

कर्नाटकात काँग्रेस नेते नागेंद्र ईडीच्या ताब्यात

राहुल गांधी यांचे अग्निवीरबाबतचे आरोप बिनबुडाचे असल्याचे माजी अधिकाऱ्याने केले स्पष्ट

नेपाळमध्ये भूस्खलन होऊन प्रवाशांनी भरलेल्या दोन बस गेल्या नदीत वाहून

केजरीवालांना अंतरिम जामीन मंजूर पण मुक्काम तुरुंगातच!

 

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
338,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा