29 C
Mumbai
Saturday, December 6, 2025
घरविशेषगडकरींची घोषणा; इतक्या दिवसांत सरकारी वाहने होणार स्क्रॅप

गडकरींची घोषणा; इतक्या दिवसांत सरकारी वाहने होणार स्क्रॅप

धोरण राज्यांना पाठवले

Google News Follow

Related

पंधरा वर्षे पूर्ण झालेल्या सर्व सरकारी वाहनांना स्क्रॅप केले जाईल. यासंदर्भातील धोरण राज्यांना पाठवण्यात आल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी सांगितले. नागपुरात वार्षिक ‘ऍग्रो-व्हिजन’ कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभात गडकरी बोलत होते. ते म्हणाले, ” पंधरा वर्षे पूर्ण झालेली भारत सरकारची सर्व वाहने भंगारात पाठवली जातील. यासंदर्भात आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली एका फाईलवर स्वाक्षरी केली आहे.

मेळाव्याला संबोधित करताना गडकरी म्हणाले की, पानिपत येथील इंडियन ऑइलचे दोन प्लांट जवळपास कार्यरत आहेत. त्यापैकी एक प्रतिदिन एक लाख लिटर इथेनॉल तयार करेल, तर दुसरा भाताच्या पेंढ्याचा वापर करून दररोज १५० टन बायो-बिटुमन तयार करेल.

पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि देशातील इतर तांदूळ पिकवणाऱ्या भागात भाताचा पेंढा जाळल्याने प्रदूषण होते. त्यामुळे आता इथेनॉल आणि बायो बिटुमेन बनवण्यासाठी भाताच्या पेंढ्याचा वापर केला जाईल. गडकरी म्हणाले, “नापीक जमिनीवर बांबूची लागवड केली जाईल, त्यातून बायोइथेनॉल तयार केले जाईल. आमचे शेतकरी केवळ अन्नदाताच राहणार नाहीत, तर ते ऊर्जा प्रदाताही बनतील.

हे ही वाचा:

 परवानगीशिवाय अमिताभ बच्चन यांचा फोटो आणि आवाज वापरता येणार नाही!

श्रद्धा वालकर प्रकरणातील लव्ह जिहाद अंँगलबद्दल काय बोलल्या स्मृति इराणी

आठ तासांची फिल्डिंग आणि चोर आले ताब्यात

विक्रम गोखले यांच्या प्रकृतीला आराम पडतोय!

देशात ८० लाख टन बायो-बिटुमनची गरज आहे आणि बहुतेक रस्ते वाहतूक विभागासाठी. देशात सुमारे ५० लाख टन बिटुमन तयार केले जाते आणि आम्ही सुमारे २५ लाख टन आयात करतो, असे गडकरी म्हणाले. असे प्रकल्प सुरू झाल्यावर आपल्या देशाला बिटुमिन आयात करण्याची गरज भासणार नाही. आमचे गाव, जिल्हे, राज्ये आणि राष्ट्रीय महामार्ग हे शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या तांदळाच्या पेंढ्याचा वापर करून बिटुमिनचे बनवलेले आहेत असेही ते म्हणाले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा