31 C
Mumbai
Monday, January 26, 2026
घरविशेष‘पुष्पा’ पुन्हा येतोय; सोमवारी पूजा करून होणार सुरुवात

‘पुष्पा’ पुन्हा येतोय; सोमवारी पूजा करून होणार सुरुवात

Google News Follow

Related

दक्षिणेतल्या चित्रपटांचा सुपरस्टार अल्लू अर्जुनचे ते तिरके चालणे, दाढीवरून उलटा हात फिरविण्याची लकब याचा पुन्हा अनुभव घेण्याची नामी संधी चाहत्यांना मिळणार आहे. होय, पुष्पा या कमाईचे विक्रम मोडणाऱ्या चित्रपटाचा सिक्वेल येऊ घातला आहे. लवकरच त्याचे शूटिंग सुरू होईल. पुष्पा द रुल २ असे या चित्रपटाचे नाव असेल.

मैत्री मूव्ही मेकर्स या प्रॉडक्शन कंपनीने अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्या सुपर हिट जोडीचे शूटिंग पुन्हा एकदा सुरू होत असल्याचे ट्विट करून जाहीर केले. इन्स्टाग्रामवरही मैत्री मूव्हीजने पुष्पाच्या सिक्वेलचा पोस्टर प्रसिद्ध केला आहे. २२ ऑगस्टला यासंदर्भात पूजा करून शूटिंगला प्रारंभ करण्यात येणार असल्याचेही प्रॉडक्शन हाऊसने स्पष्ट केले आहे.

“#PushpaRaj is back! This time to Rule #PushpaTheRule Pooja Ceremony tomorrow असे यात म्हटले आहे.

पुष्पाचा हा सिक्वेल येत असल्याचे जाहीर झाल्यानंतर या चित्रपटाच्या कोट्यवधी चाहत्यांची उत्सुकता चाळवली आहे. पुष्पाच्या पहिल्या प्रयोगात अल्लू अर्जुनच्या अदाकारीने सर्वांची मने जिंकली होती. त्याचे तिरके चालणे, एक खांदा झुकवून संवादफेक करणे, दाढीवरून उलटा हात फिरवून झुकेगा नही…हा त्याचा संवाद प्रचंड लोकप्रिय ठरला होता.

हे ही वाचा:

बनावट पासपोर्ट, व्हीसाच्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश

भारत आदर्श समाज म्हणून उदयास यावा यासाठी आरएसएसचे काम

फडणवीसांची वॉशिंग मशीन आणि फोन टॅपिंगचा जांगडगुत्ता…

कॉंग्रेसला आणखी एक धक्का, आनंद शर्मा यांचा राजीनामा

 

हा चित्रपटच केवळ लोकप्रिय ठरला नाही तर या चित्रपटावरून अनेकांनी सेल्फी बनवून त्यातले संवाद, त्यातली नृत्य याचे अनुकरण केले होते. अगदी ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरनेही त्यावर नृत्य केले होते आणि त्याच्या मुलींनीही तसेच नृत्य करुन पुष्पाला पसंती दिली होती.

लाल चंदनाची चोरी आणि त्यात मुरलेल्या गुंडांना शह देणारा पुष्पराज सर्वांना भावला होता. त्यातली गाणीही प्रचंड हिट ठरली होती.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा