28 C
Mumbai
Monday, December 8, 2025
घरविशेषहिमाचल प्रदेशात भूस्खलन; ५४ घरे खचल्याची भीती

हिमाचल प्रदेशात भूस्खलन; ५४ घरे खचल्याची भीती

पाऊस कमी झाला असला तरी भूस्खलनाचा धोका अद्याप टळलेला नाही

Google News Follow

Related

हिमाचल प्रदेशात पावसाचा जोर कमी झाला असला तरी भूस्खलनाच्या घटना कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. २५ ऑगस्ट रोजी राज्यातील बहुतेक ठिकाणी पावसाने विश्रांती घेतल्याने लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला असला तरी भूस्खलनाचा धोका अद्याप टळलेला नाही.

 

राज्यातील आपत्कालीन विभागाने दिलेल्या अहवालानुसार, गेल्या २४ तासांत तब्बल ५४ छोटी-मोठी घरे जमीनदोस्त झाली आहेत. तसेच, सुमारे २०३ घरांना भेगा पडल्या आहेत. तसेच, ८५ पशुशाळांचेही नुकसान झाले आहे. मंडी जिल्ह्यात सर्वाधिक ३५ घरे जमीनदोस्त झाली आहेत. कांगडामध्ये नऊ, शिमला व सोलनमध्ये प्रत्येकी तीन, उना व हमीरपूमध्ये प्रत्येकी दोन घरे जमीनदोस्त झाली आहेत. राज्यातील चार राष्ट्रीय महामार्गांसह ७२९ रस्त्यांचे नुकसान झाले आहे. मंडी विभागात सर्वाधिक २८२ रस्ते बंद झाले. तसेच, शिमला झोनमध्ये २२९, हमीरपूर झोनमध्ये १२५, कांगडा झोनमध्ये ८९ रस्त्यांवरील वाहतूक बंद झाली.

 

३१ ऑगस्टपर्यंत हवामानाची स्थिती वाईट राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच, पुढील २४ तासांत काही ठिकाणी गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र २७ ऑगस्ट ते ३१ ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा कोणताही अलर्ट अद्याप देण्यात आलेला नाही.

हे ही वाचा:

पृथ्वी ते चंद्रापर्यंतच्या अंतरापर्यंतचे रस्ते गावागावांत बनले

भारताच्या चांद्रयान मोहिमेच्या यशानंतर ब्रिटनने ओकली गरळ

जगद्गुरू रामभद्राचार्य यांच्या अमृतमहोत्सवी जन्मोत्सवाची घोषणा

भारताचे तिघे भालाफेकीच्या अंतिम फेरीत

गेल्या २४ तासांत शिमसासहित राज्यातील अनेक भागांत कमी पाऊस पडला आहे. या कालावधीत बिलासपूर जिल्ह्यातील काहू भागात सर्वांत जास्त ९० मिमी पावसाची नोंद झाली. तर, हमीरपूर जिल्ह्यातील नादौन येथे ६० मिमी, कसौलीमध्ये ५० मिमी, गुलेर व पालमपूरमध्ये प्रत्येकी ४० मिमी तर, जोगेन्द्रनगर, देहरा गोपीपूर, हमीरपूरमध्ये प्रत्येकी ३० मिमी पावसाची नोंद झाली.

शिमल्यामधील बाजारपेठा गजबजल्या

शिमल्यामध्ये शुक्रवारी, कित्येक दिवसांनी सूर्यनारायणाने दर्शन दिल्याने लोकांना दिलासा मिळाला होता. गेले तीन-चार दिवस शिमल्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते. शुक्रवारी हवामानात बरीच सुधारणा झाली होती. ऊन आल्यामुळे शिमल्यातील रस्त्यावर वर्दळही दिसली. शहरातील बाजारपेठाही गजबजल्या होत्या.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा