22 C
Mumbai
Tuesday, December 30, 2025
घरविशेषशिक्षण विभागात रिक्त पदे भरणार कधी?

शिक्षण विभागात रिक्त पदे भरणार कधी?

Google News Follow

Related

महाराष्ट्रात एकूणच शिक्षण क्षेत्रात चाललेल्या अनागोंदीत आता भर पडली आहे ती शिक्षण विभागातील रिक्त पदांमुळे निर्माण झालेल्या समस्येची. विविध गैरप्रकारांबाबत अनेक तक्रारी शिक्षक, पालकांकडून केल्या जात आहेत. शिक्षण विभागामध्ये राज्यभरात तब्बल ६५ टक्के जागा रिक्त असल्याचे निदर्शनास आले आहे. तर एकट्या मुंबईत ८५ टक्के जागा भरल्या गेल्या नाहीत.

ही सर्व पदे रिक्त असल्याने पालकांच्या महत्त्वाच्या समस्यांकडे कुणाचेच लक्ष नाही. तसेच शिक्षकांनी केलेल्या तक्रारींनाही इथे कुणीच विचारत नाही. मुंबईसारख्या महानगरामध्ये अनेक पदे रिक्त आहेत. यामध्ये सहायक उपशिक्षणाधिकारी यांची ३७ पदे मंजूर झाली पण भरती केवळ सहा पदांचीच झालेली आहे. त्यामुळे ३१ पदे या विभागात अजून भरलेलीच नाहीत. अशीच अवस्था इतरही विभागांचीही आहे.

राज्यामध्ये शिक्षण संस्थेतील अनेक महत्त्वाची पदे आजही रिक्त आहेत. त्यामुळेच आता यापुढील शाळांचा कारभार कसा चालणार हा प्रश्न आता उपस्थित होऊ लागलेला आहे. शैक्षणिक प्रशासनातील पदे खाली असल्यामुळे अनेक गोंधळांना सामोरे जावे लागत आहे. शैक्षणिक प्रशासकीय पदांसाठी ८८५ पदे मंजूर झालेली आहेत. त्यातील केवळ ३०० पदे भरली गेली आहेत.  उरलेल्या पदांसाठी अजून नेमणूकच नाही. याव्यतिरिक्त गटशिक्षणाधिकारी यांची ६६९ पदे असून केवळ २२७ पदांवर भरती झालेली आहे बाकीची पदे रिक्तच आहेत. वरचेवर या गोष्टींचा पाठपुरावा करुनही सरकारकडून कुठलेही ठोस पाऊल उचलण्यात आलेले नाही.

हे ही वाचा:
‘बेस्ट’वर एसटीचा ७० कोटींचा भार

रेल्वे टीसीने पकडलेला तरुण म्हणतो, जगायचं कसं?

‘वाघ आमच्या इशाऱ्यावर चालतो’…वडेट्टीवार शिवसेनेवर गुरगुरले

लस न घेतलेल्यांनाच ‘डेल्टा प्लस’चा धोका जास्त

यासंदर्भात भाजपा मुंबईने म्हटले आहे की, प्रत्येक शिक्षण शाखेत खेळखंडोबा झालाय, प्राथमिक-माध्यमिक शिक्षणही ठाकरे सरकारने वाऱ्यावर सोडलंय. शिक्षण विभागात राज्यात ६५% तर मुंबईत ८५% पदे रिक्त आहेत. फीवाढ-शिक्षकांच्या तक्रारींना ऐकणारंच कुणी नाहीय. शिक्षणाची ऐशी तैशी करण्याचा पण सरकारने केलाय.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
285,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा