29 C
Mumbai
Wednesday, May 8, 2024
घरविशेषलस न घेतलेल्यांनाच 'डेल्टा प्लस'चा धोका जास्त

लस न घेतलेल्यांनाच ‘डेल्टा प्लस’चा धोका जास्त

Google News Follow

Related

कोरोना लसीच्या परिणामकारकतेवर अनेकवेळा प्रश्नचिन्ह उपस्थित केली गेली आहेत. परंतु आता महाराष्ट्रातच या दुष्प्रचाराला आळा बसला आहे. डेल्टा प्लस विषाणूच्या प्रकाराबद्दल सर्वच स्तरावर चिंता व्यक्त होत आहे. विशेष करून लस न घेतलेल्या लोकांमध्ये ‘डेल्टा’ हा विषाणू अधिक वेगाने पसरत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. राज्यात सध्याच्या घडीला डेल्टा प्लसचे २१ रुग्ण आहे, त्यापैकी नुकताच एक रुग्ण दगावला आहे. या सर्व रुग्णांची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने घेतली असून त्यांच्यापैकी एकाच रुग्णाने लसीकरणाचा एक डोस घेतला असल्याची माहिती उजेडात आली आहे.

दुसरी लाट ओसरत असतानाच वैद्यकीय क्षेत्रात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या सर्व प्रकारात डेल्टा प्लस विषाणूने चिंतेत भर टाकली आहे. जगात सध्या सर्वात जास्त चिंता डेल्टा विषाणूबाबत व्यक्त केली जात आहे. त्याच्याच परावर्तित प्रकाराचे म्हणजे डेल्टा प्लसचे २१ रुग्ण राज्यात आहेत. त्यापैकी सर्वात अधिक रुग्ण रत्नागिरी, जळगाव येथे असून काही रुग्ण मुंबई, ठाणे, रायगड परिसरात आहे.

याप्रकरणी अधिक माहिती देताना राज्याच्या आरोग्य विभागाचे सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले की, “राज्यातील या सर्व डेल्टा प्लस बाधित २१ रुग्णांवर आरोग्य व्यवस्थेचे लक्ष असून सर्व रुग्णांची माहिती गोळा करण्यात आली आहे. त्यामध्ये असे लक्षात आले आहे कि या २१ रुग्णांपैकी मुंबई स्थित एकाच रुग्णाने लसीचा एक डोस घेतला होता. बाकीच्या अन्य २० रुग्णांनी कोणतीही लस घेतली नव्हती. या २१ पैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे, ती महिला डॉक्टरांना उपचारकरिता कोणतेतही सहकार्य करत नव्हती. त्यांच्यावर मानसिक आरोग्याचे उपचार सुरु होते. इतर सर्व २० रुग्णांमध्ये सौम्य ते मध्यम स्वरूपाची लक्षणे असून सर्व रुग्णांची तब्बेत स्थिर आहे.

हे ही वाचा:

इम्पेरिकल डाटा हा राज्य सरकारचा विषय

मी ओबीसी असल्यामुळे मला महसूल खातं मिळालं नाही

संजय राऊत खातात शिवसेनेचं पण जागतात पवारांच्या निष्ठेला

रंगेल हंटर बायडनचं पितळ उघडं पडलं

डेल्टा प्लस रुग्णांची लक्षणे ही सर्वसाधारण कोरोनाची लक्षणे असतात त्याप्रमाणेच आहेत. या विषाणूचा प्रादुर्भाव किती गंभीर आहे, याबाबत अधिक अभ्यास होणे गरजेचे आहे. केंद्र सरकारने मात्र, हा विषाणूंचा चिंताजनक प्रकार असल्याचे म्हटले आहे. या विषाणूचा फैलाव किती राहील हे आताच सांगणे मुश्किल आहे. ह्या नवीन विषाणूचे वर्तन कसे असेल याबाबत आता कुणीच काही सांगू शकत नाही. विषाणूचे परावर्तित होणे म्हणजे नेमके काय होते हे जाणून घेणे गरजेचे आहे. वैद्यकीय तज्ञांचे मते, हे यापूर्वीच्या साथीच्या आजारात दिसून आले आहे कि, प्रत्येक विषाणूं हा आपले अस्तित्व टिकवून ठेवत असतो. याकरिता तो स्वतःच्या रूपामध्ये बदल करून घेत असतो. कोरोनाच्या या काळातच ब्राझील स्ट्रेन, यु के स्ट्रेन, दक्षिण आफ्रिकेतील स्ट्रेन बघितले आहे. भविष्यात असे आणखी विषाणूचे प्रकार येण्याची शक्यता नाकारता येत नाही. विषाणूचे बदल होत जाणे ही एक प्रक्रिया आहे आणि याचे ज्ञान वैद्यकीय जगताला अवगत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
150,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा