29 C
Mumbai
Sunday, December 7, 2025
घरविशेषडॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त 'आंबेडकर यात्रा ट्रेन'

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त ‘आंबेडकर यात्रा ट्रेन’

पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी भारतीय रेल्वेद्वारा देशभरात 'भारत गौरव टुरिस्ट ट्रेन

Google News Follow

Related

भारत एक विविधतासंपन्न असा देश आहे.भारतीय संस्कृती, कला तेथील उत्सव आणि ऐतिहासिक वस्तुंमुळे भारत संपूर्ण जगात ओळखला जातो. भारतातील लोकांना पुन्हा एकदा आपल्या देशातील कला, संस्कृतीची ओळख पटवून देण्यासाठी तसेच पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी भारतीय रेल्वेद्वारा देशभरात ‘भारत गौरव टुरिस्ट ट्रेनचे’ अनावरण केले जात आहे.

१४ एप्रिल या दिवशी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती जगभरात साजरी केली जाते. भारत सरकारने त्यांच्या जन्मदिनी भारत गौरव योजनेद्वारे ”आंबेडकर यात्रा” रेल्वे सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वेत ६०० पर्यटक प्रवास करू शकतील. हा प्रवास ८ दिवसीय असून यात दिल्ली येथील आंबेडकरांच्या आयुष्याशी संबंधित पर्यटन स्थळे आणि भारतीय वारसास्थळांची भेट घेता येईल.

दिल्ली येथील सफदरजंग स्थानकावरून याची सुरुवात होईल आणि बाबासाहेबांचे जन्म स्थान मध्यप्रदेश मधील महू येथे पहिला प्रवासी घेण्यात येईल.पर्यटकांचा विचार करता आयआरटीसीने प्रथम आणि दुय्यम श्रेणीमध्ये याचे वर्गीकरण केले गेले असून यात खाद्यपदार्थांचाही समावेश करण्यात आला आहे. प्रवासांच्या सुरक्षेसाठी रेल्वेत सुरक्षारक्षक तसेच रेल्वेत कॅमेरे बसवण्यात आले आहेत.

हे ही वाचा:

आरे-बीकेसी नंतर आता मेट्रो ३ वरळीपर्यंत धावणार

केशुब महिंद्रा यांचे ९९ व्या वर्षी निधन

बॉम्बस्फोट दृश्याच्या शूटिंगदरम्यान संजय दत्त जखमी

पंजाबमधील लष्करी तळावरच्या गोळीबारात चार जवानांचा मृत्यू

 

या टुरिस्ट पॅकेज मध्ये गाईड सोबत बसने भ्रमण करता येईल. ठिकठिकाणी विश्रामगृहाची सोय, जेवणाची सोय तसेच पर्यटकांच्या विम्याची सोय करण्यात आली आहे. गौरव यात्रा आधारित ”पहा आपला देश” ह्या योजने अंतर्गत गुरु कृपा यात्रा, गारवी गुजरात, उत्तर- पूर्व शोध, रामायण यात्रा आणि श्री जगन्नाथ यात्रा इत्यादी ठिकाणी पर्यटनाची सोय केली गेली आहे. ‘गौरव यात्रा ‘ हा दौरा रेल्वे मंत्रालय, पर्यटन, सामाजिक न्याय आणि डॉ. बाबासाहेब फाऊंडेशन यांच्या पुढाकाराने करण्यात आला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा