बांगलादेशातील सर्वात मोठा इस्लामी पक्ष जमात-ए-इस्लामी आगामी १२ फेब्रुवारी २०२६ च्या सार्वत्रिक निवडणुकीत आतापर्यंतच्या सर्वात मजबूत कामगिरीच्या उंबरठ्यावर आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिका या पक्षाशी संवाद वाढवण्याच्या तयारीत असल्याचे संकेत द वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तातून समोर आले आहेत.
अमेरिकेचे संकेत काय आहेत?
वॉशिंग्टन पोस्टनुसार, ढाका येथे कार्यरत असलेल्या एका अमेरिकन मुत्सद्द्याने १ डिसेंबर २०२५ रोजी बंद दरवाजामागील पत्रकार भेटीत म्हटले की, बांगलादेशमध्ये कट्टर धार्मिकतेकडे झुकाव वाढत आहे)
जमात-ए-इस्लामी निवडणुकीत पूर्वीपेक्षा जास्त जागा जिंकू शकतो, अशी शक्यता आहे. अशातच अमेरिका या पक्षाशी “मैत्रीपूर्ण संबंध” ठेवू इच्छिते.
अमेरिकन दूतावासाने मात्र सांगितले की ही फक्त सर्वसाधारण अशी चर्चा होती आणि अमेरिका कोणत्याही पक्षाच्या बाजूने नाही.
जमात-ए-इस्लामी इतका मजबूत कसा झाला?
हा पक्ष पूर्वी १९७१ च्या स्वातंत्र्ययुद्धात पाकिस्तानच्या बाजूने असल्याचा आरोप केला गेला होता. त्यामुळे अनेक वर्षे राजकारणातून बंदी घालण्यात आली.कडवे इस्लामी विचार, शरीयत कायद्याचे समर्थन हे या पक्षाचे वैशिष्ट्य आहे.
पण आता प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न या पक्षाने सुरू केला आहे. त्यासाठी त्यांनी भ्रष्टाचारविरोधी अजेंडा, सामाजिक कल्याण कार्यक्रम, युवकांमध्ये वाढता प्रभाव, विद्यापीठ विद्यार्थी निवडणुकांमध्ये मोठे विजय यावर भर दिला आहे.
इंटरनॅशनल रिपब्लिकन इन्स्टिट्यूटच्या सर्वेक्षणात 53% लोकांनी जमातला पसंती दिली आहे.
हे ही वाचा:
बदलापूरातील नराधमाला २७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी
भारतीय पासपोर्टचे जागतिक स्थान सुधारलं
छगन भुजबळ महाराष्ट्र सदन घोटाळ्यात निर्दोष
रणजी ट्रॉफी: सरफराज खानचा धमाकेदार दुहेरी शतक
भारत-अमेरिका संबंधांवर परिणाम?
विशेषज्ञांचे म्हणणे आहे की, जमातचा पाकिस्तानकडे कल आहे. भारताशी त्यांचे संबंध तणावपूर्ण आहेत. अमेरिका जर जमातच्या जवळ गेला, तर भारत-अमेरिका संबंधात तणाव वाढू शकतो.
अमेरिकन मुत्सद्द्याचा इशारा
जर जमातने सत्तेत येऊन महिलांच्या अधिकारांवर बंधने आणली, शरीयत कायदा कठोरपणे लागू केला तर बांगलादेशच्या वस्त्रोद्योगावर १००% टॅरिफ लावले जाऊ शकतात. त्यातून बांगलादेशची अर्थव्यवस्था कोलमडेल” असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.







