29 C
Mumbai
Thursday, January 22, 2026
घरविशेषनागपूरच्या अभियंत्याने बनविले इंधानाविना चालणारे पेरणी यंत्र

नागपूरच्या अभियंत्याने बनविले इंधानाविना चालणारे पेरणी यंत्र

आठ तासात चार एकर जमिनीवर पेरणी करणे शक्य होणार

Google News Follow

Related

शेतीच्या कामासाठी मजूरांचा अभाव या समस्येवर नागपूरमधील एका अभियंत्याने उपाय शोधून काढला आहे. त्याने इंधनाविना चालणारे पेरणी यंत्र बनवले आहे. या यंत्राद्वारे आठ तासात चार एकर जमिनीवर पेरणी करणे शक्य होणार आहे.

नागपूर जिल्ह्यातील मेकॅनिकल इंजिनिअर असलेले ओमप्रकाश कैलास देशमुख यांनी हे पेरणी यंत्र बनवले आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांना हे यंत्र खूपच फायद्याचे ठरू शकणार आहे. ग्रामीण भागात बैलाचे भाडे १ हजार ५०० रूपये आणि बैल चालवणाऱ्याला ५०० रूपये असा दिवसाला किमान २ हजार रूपये खर्च येतो. मात्र, अनेकदा इतका खर्च करूनही शेतात काम करायला मजूर मिळत नाहीत. त्यामुळे अभियंता ओमप्रकाश देशमुख यांचे पेरणी यंत्र अशा शेतकऱ्यांसाठी खूप सोईचे ठरणार आहे.

या यंत्राद्वारे एकूण ३० प्रकारचे बियाणे पेरता येते. यात एकावेळी तीन किलो बियाणे मावेल अशी टाकी दिलेली आहे. प्रत्येक बियाण्याच्या आकारमानानुसार वेगवेगळ्या चकत्या दिलेल्या आहेत. पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना सतत वाकावे लागल्यामुळे पाठदुखी सारखे आजार होतात. या यंत्राने पेरणी करण्यासाठी ताठ चालावे लागते. शिवाय आराम करून पेरणी केली तरी एका दिवसात किमान साडेतीन एकरात पेरणी होते.

पेरण्याची मशीन ७ हजार रुपयांची आहे. यात एकाचवेळी बियाणे आणि खत पेरणी करण्याची दोन टाकीचे पेरणी यंत्रही येते. त्याची किंमत १० हजार रूपये आहे. वापरायला सुलभ असलेल्या या यंत्राद्वारे पट्टा पद्धतीने पेरणी होते. त्याशिवाय हे यंत्र मशागतीला सुलभ आहे. या मॅन्युअल सीड ड्रिल मशिनला १२ दाते आहे.

हे ही वाचा:

इंग्लंडचा आक्रमक खेळ; पहिल्याच दिवशी ३९३ धावांवर डाव घोषित

बिपरजॉयचं आगमन झालं आणि ७०० बाळांनी जन्म घेतला

सावरकर आमचे आदर्श, उद्धव ठाकरे गटाला आली जाग

“इस्लाम कबूल कर, नाहीतर गोळ्या घालेन”, अल्पवयीन मुलीला धमकी

हे माशील अल्पभूधारक शेतकऱ्यांना फायद्याचे असल्याचे ओमप्रकाश देशमुख म्हणाले. एका दिवसात साधारणत: पेरणीसाठी सात महिलांची गरज भासते. या महिलांना प्रतिव्यक्ती २०० रूपये दराने मजुरी दिल्यास साडेतीन एकरसाठी एका दिवसाला १ हजार ४०० रूपये खर्च होतात. एकूण खर्च सुमारे सात ते आठ हजार येतो. याउलट पेरणी यंत्र सात हजार रुपयात मिळते. वर्षभरात खर्च निघतो. तसेच आपले काम झाल्यावर इतर शेतकऱ्यांनाही यंत्र भाड्याने देऊन उत्पन्न देखील मिळवता येते.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा