26 C
Mumbai
Saturday, November 9, 2024
घरविशेषभारतात दहशत माजवण्याचा कट उघड, पाकिस्तानने पाठवलेला आयईडी बॉम्ब जप्त!

भारतात दहशत माजवण्याचा कट उघड, पाकिस्तानने पाठवलेला आयईडी बॉम्ब जप्त!

बीएसएफ दलाची कारवाई

Google News Follow

Related

भारतात दहशत माजवण्याचा पाकिस्तानचा कट उघड पडला आहे. पंजाबच्या सीमेला लागून असलेल्या फाजिल्का येथील भारत-पाकिस्तान सीमा भागात ड्रोनद्वारे पाठवलेला आयईडी बॉम्ब जप्त करण्यात आला आहे. आरडीएक्सने भरलेल्या या खेपमध्ये बॉम्बसह बॅटरी आणि टायमर देखील आहे. बीएसएफला बॉम्ब सापडल्यानंतर तो जप्त करत स्पेशल सेलला देण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फाजिल्काच्या अबोहर सेक्टरमधील भारत-पाकिस्तान सीमा भागातील बहादूरजवळ ड्रोनची हालचाल दिसली. याची माहिती बीएसएफला मिळताच दलाने परिसरात शोध घेतला. झडतीदरम्यान, परिसरातून एक आयईडी (इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाइस) बॉम्ब जप्त करण्यात आला.

बीएसएफला तपासणी दरम्यान, एक डब्बा सापडला, ज्यामध्ये एक किलो आरडीएक्सने भरलेला होता. त्यासोबत बॅटरी आणि टायमर देखील होता. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.

हे ही वाचा : 

दलालांना दणका, आता १२० नाही ६० दिवसांत करायचे रेल्वे तिकीट बुक!

सिद्धरामय्यांनी आता राजीनामा द्यावा

बहराइच हत्येतील आरोपी सर्फराज, तालिबला पायावर मारल्या गोळ्या

नायबसिंग सैनी यांनी घेतली घेतली हरियाणाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ!

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
189,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा