31 C
Mumbai
Monday, September 21, 2026
घरविशेषशिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या दर्ग्यावर कारवाई कधी?

शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या दर्ग्यावर कारवाई कधी?

किरीट सोमय्यांनी केली मागणी

Google News Follow

Related

- Advertisement -National Stock Exchange

छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी अनधिकृत दर्गा उभारण्यात आल्याची धक्कादायक आणि संतापजनक बाब उघडकीस आली आहे. या अनधिकृत दर्ग्याच्या बांधकामावरून राजकीय वाद निर्माण झाला असून भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ही बाब प्रकाशझोतात आणत कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी या बांधकामावरून ‘लँड जिहाद’चा आरोप करत प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी लावून धरली आहे.

किरीट सोमय्या यांनी शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी प्रत्यक्ष पाहणी करत या ठिकाणी ‘दर्गाह शरीफ’ नावाचा फलक काही महिन्यांपूर्वी अचानक लावण्यात आल्याचा दावा केला. किल्ल्याच्या संरक्षित परिसरात अशा प्रकारचे बांधकाम करता येत नसल्याचे सांगत त्यांनी गेल्या काही काळात येथे अनधिकृत बांधकाम झाल्याचा आरोप केला. या संदर्भात प्रशासन, पोलीस आणि पुरातत्त्व विभागाकडे तक्रारी करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

छत्रपती शिवरायांचा जिथे जन्म झाला त्या शिवनेरी किल्ल्यावर लँड जिहाद केला जातो आहे. दरगाह शरीफ नावाचा फलक गेल्या काही महिन्यांत या ठिकाणी दिसू लागला आहे. ही किल्ल्याची बॉर्डर आहे. या ठिकाणी १०० मीटर भागात काहीही करता येत नाही. पण काही मुस्लिम आणि बांगलादेशी मुस्लिमांनी लँड जिहादवाल्यांनी खोटा असा दर्गा उपस्थित केला आहे. तीन दिवस आम्ही वाट पाहणार आणि त्यानंतर या ठिकाणी सगळे हिंदू भक्त येऊन ठिय्या आंदोलन करणार असं म्हणत किरीट सोमय्यांनी व्हिडीओ पोस्ट केला आहे.

हे ही वाचा:

विधानसभेतील गदारोळानंतर बीआरएसचे २२ आमदार निलंबित

अमेरिकेची मानवरहित पाणबुडी इराणच्या ताब्यात?

‘दीपस्तंभ’ने दिली साथ; दिव्यांगत्वावर केली मात

नोकरी सोडा, अन्यथा मृत्यूला सामोरे जा!

दरम्यान, या प्रकरणाची प्रशासनाकडून दखल घेण्यात आली आहे. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, पुरातत्व अधिकारी (पुणे) यांनी शिवनेरी किल्ला येथील ‘दर्गाह शरीफ’च्या बेकायदेशीर बांधकामांना काही दिवसांत पाडण्याचे मान्य केल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
334,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा