29.4 C
Mumbai
Thursday, October 22, 2026
घरविशेषअँका मारिया - वर्मा यांची संयुक्त राष्ट्रांमध्ये 'विशेष राजदूत' म्हणून नियुक्ती

अँका मारिया – वर्मा यांची संयुक्त राष्ट्रांमध्ये ‘विशेष राजदूत’ म्हणून नियुक्ती

मानवतावादी व सामाजिक कार्याची दखल

Google News Follow

‘इंटर-गव्हर्नमेंटल इन्स्टिट्यूशन फॉर द युज ऑफ मायक्रो- अल्गी स्पिरुलिना अगेन्स्ट मालन्युट्रिशन’ या संयुक्त राष्ट्रांशी संलग्न आंतर-सरकारी संस्थेने  अँका-मारिया वर्मा यांची भारतासाठी विशेष राजदूत (ॲम्बेसेडर-एट-लार्ज) म्हणून नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती २० ऑक्टोबर २०२६ पासून पुढील पाच वर्षांच्या कालावधीसाठी १९ ऑक्टोबर २०३१ पर्यंत लागू असेल.
या महत्त्वपूर्ण नियुक्तीची अधिकृत घोषणा ‘द ऑफिस ऑफ द वर्मा फॅमिली’ आणि आयआयएमएसएएम (IIMSAM) द्वारे करण्यात आली आहे.अँका-मारिया वर्मा या प्रसिद्ध उद्योगपती आणि शिवसेना नेते अभिषेक वर्मा यांच्या सौभाग्यवती होत.

मानवतावादी सेवेची दखल

आयआयएमएसएएम (IIMSAM) चे सरचिटणीस महामहीम रेमिगिओ मॅराडोना यांच्या हस्ते हे नियुक्तीपत्र जारी करण्यात आले. श्रीमती अँका वर्मा यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर सामाजिक कार्य, परोपकारी उपक्रम आणि शाश्वत विकासासाठी केलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. श्रीकांत वर्मा ट्रस्टच्या विश्वस्त म्हणून कार्यरत असलेल्या अँका मारिया वर्मा यांचा सांस्कृतिक, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील उपक्रमांशी दीर्घ काळापासून निकटचा संबंध राहिला आहे.

हे ही वाचा:

राहुल गांधींचे पुन्हा ‘मिलते है ब्रेक के बाद…’

टायगर श्रॉफ टार्गेटवर नव्हताच! मोठ्या व्यक्तीला संपवण्याचा होता डाव

सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्या सुटकेसाठी रात्री न्यायालयाचे दरवाजे उघडा

शिवा शर्मा मृत्यूप्रकरणातील फरार श्रद्धा दुबेला नागपुरात अटक

आयआयएमएसएएमचे कार्य आणि ध्येय

यूएन आयआयएमएसएएम (UN IIMSAM) ही संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेत (ECOSOC) कायमस्वरूपी निरीक्षक दर्जा असलेली एक आंतर-सरकारी संस्था आहे. कुपोषण निर्मूलनासाठी स्पिरुलिना (सूक्ष्म शैवाल) या पोषक घटकाचा प्रभावी वापर करणे, अन्न सुरक्षा बळकट करणे, सार्वजनिक आरोग्याचा दर्जा उंचावणे आणि संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्टांना गती देणे हे या संस्थेचे मुख्य ध्येय आहे.

भारतातील भूमिकेची रूपरेषा

आपल्या या नव्या भूमिकेत श्रीमती अँका वर्मा भारतातील आयआयएमएसएएम (IIMSAM) च्या विविध मानवतावादी आणि आरोग्यविषयक प्रकल्पांना गती देतील. संस्थेचे उद्दिष्ट यशस्वी करण्यासाठी विविध शासकीय व गैर-सरकारी संस्थांसोबत भागीदारी स्थापित करणे, आंतरराष्ट्रीय सहकार्य मिळवणे आणि विविध भागधारकांना एकत्र आणण्याचे महत्त्वाचे कार्य त्या करणार आहेत. आयआयएमएसएएम (IIMSAM) च्या भारतासाठीच्या या अभियानामुळे देशातील कुपोषणविरोधी लढ्याला आणि सामाजिक-आरोग्य उपक्रमांना नवी दिशा मिळेल,” असा विश्वास आयआयएमएसएएम (IIMSAM) चे भारतासाठीचे राजदूत महामहीम असिफ अयुब (H.E. Asif Ayoob) यांनी व्यक्त केला आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा