31 C
Mumbai
Tuesday, December 23, 2025
घरविशेष... अन् मुकेश अंबानी यांच्या डोळ्यांत तरळले अश्रू

… अन् मुकेश अंबानी यांच्या डोळ्यांत तरळले अश्रू

Google News Follow

Related

उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा तीन दिवसांचा विवाहपूर्व सोहळा गुजरातमधील जामनगर येथे होत आहे. त्यातील एका कार्यक्रमादरम्यान अनंत अंबानी यांनी आपल्या आरोग्याच्या समस्येबाबत सांगताना मन मोकळे केले. हे पाहून मुकेश अंबानी यांच्या डोळ्यांतही अश्रू तरळले.

अनंत अंबानी यांनी लहानपणी त्यांना भेडसावलेल्या आरोग्यविषयक समस्यांबाबत मन मोकळे केले आणि त्यासाठी पालकांनी केलेल्या मेहनतीसाठी आभार मानले. ‘मी एक खास व्यक्ती आहे, असे मला वाटावे, यासाठी माझ्या कुटुंबाने सर्व काही केले. मला खूप त्रास होत असे. मला लहानपणापासूनच आरोग्यासंबंधी काही समस्या होत्या. मात्र माझ्या आईवडिलांनी कधी मला जाणवू दिले नाही की मला त्रास होतोय. ते नेहमीच माझ्या पाठिशी उभे राहिले,’ असे अनंत म्हणाले. त्यावेळी तिथे उपस्थित असलेले त्यांचे वडील, रिलायन्स उद्योगाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.

हे ही वाचा:

‘सीमा मर्यादा कराराचे चीनने पालन करणे आवश्यक’

पाकिस्तानमध्ये आणखी एका मोस्ट वाँटेड दहशतवाद्याची हत्या

वातावरण बदलाचा परिणाम वेळास कासव महोत्सवावर

४ दिवसांत ४०० जेट, अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगमध्ये जमले खास सेलिब्रिटी!

अनंत आणि राधिका यांच्या विवाहपूर्व सोहळ्याला शुक्रवारपासून सुरुवात झाली. या तीन दिवसीय सोहळ्यासाठी सुमारे एक हजारांहून अधिक पाहुण्यांनी हजेरी लावली आहे. त्यामध्ये जगभरातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींचाही समावेश आहे. मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स, मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्ग आणि भारतीय चित्रपट क्षेत्रातील अमिताभ बच्चन, शाहरुख खान, आमिर खान, दीपिका पडुकोण आणि रणविर सिंगसह तमाम तारकांची मांदियाळी जामनगरमध्ये आली आहे. शुक्रवारी पॉपस्टार रिहाना हिने पहिल्यांदाच भारतात अंबानी यांच्या विवाहपूर्व सोहळ्यात सादरीकरण केले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
285,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा